निळु फुले यांच्या मुलीला पाहिलंत का?, ती सुद्धा आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:23 PM2022-04-04T14:23:58+5:302022-04-04T14:27:09+5:30

निळू फुले आज आपल्यात नाही. पण त्यांची कन्या त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. होय, निळू फुले यांची कन्यादेखील अभिनय क्षेत्रात आहे

Have you seen Nilu Phule's daughter? She is also a famous actress in Marathi cinema | निळु फुले यांच्या मुलीला पाहिलंत का?, ती सुद्धा आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

निळु फुले यांच्या मुलीला पाहिलंत का?, ती सुद्धा आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

‘बाई वाड्यावर या...’ हा संवाद आठवला की पाठोपाठ आठवतो तो एक रांगडा अभिनेता. होय, अनेक भूमिका अजरामर करणारे अभिनेते निळू फुले ( Nilu Phule ). आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल 40 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे. मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पौराणिक व कौटुंबिक कथांचा काळ सुरु होता, तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला. ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 

निळू फुले यांची कन्या त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. निळू फुले यांची कन्यादेखील अभिनय क्षेत्रात आहे. अनेक मालिकांमध्ये तुम्ही तिला पाहिले असेलच. निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते आहे. सध्या त्या 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत बेबी मावशीची भूमिका साकरत आहेत. गार्गी विवाहित आहेत. 2007 साली त्यांनी ओंकार थत्ते यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघांना अनय नावाचा मुलगा आहे.


गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेशिवाय ‘ कट्टी बत्ती’ या मालिकेत काम केले होते. ‘ कट्टी बत्ती’ या मालिकेच्या वेळीच त्यांना ‘तुला पाहते रे’ या मालिकेविषयी विचारण्यात आले होते. पण ‘कट्टी बत्ती’चे चित्रीकरण सुरु असल्याने त्यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी नकार दिला होता. पण या मालिकेचे निर्माते गार्गी यांच्यासाठी थांबले होते.

Web Title: Have you seen Nilu Phule's daughter? She is also a famous actress in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.