फैझली जागा घेणार हर्षद अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 16:22 IST2017-05-27T10:52:33+5:302017-05-27T16:22:33+5:30

प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने मोहिनी टाकणारा अभिनेता हर्षद अरोरा पुन्हा एकदा टीव्ही मालिकांमध्ये परतणार आहे. ‘हर मर्द का दर्द’ मालिकेचा ...

Harshad Arora to take a fresher position | फैझली जागा घेणार हर्षद अरोरा

फैझली जागा घेणार हर्षद अरोरा

रेक्षकांवर आपल्या अभिनयाने मोहिनी टाकणारा अभिनेता हर्षद अरोरा पुन्हा एकदा टीव्ही मालिकांमध्ये परतणार आहे. ‘हर मर्द का दर्द’ मालिकेचा नायक फैझल रशीदच्या जागी आता निर्मात्यांनी हर्षद अरोराची निवड केली आहे. होय, हर्षद पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी टीव्ही मालिकेत येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या मालिकेची प्रेक्षकसंख्या (टीआरपी) वाढविण्याच्या हेतूने निर्मात्यांनी मालिकेत नायकाची भूमिका करणार्‍्या फैझल रशीदच्या जागी हर्षद अरोराला घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांशी नातं जोडण्यात फैझल कमी पडत होता आणि तो आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकत नसल्याचं निर्मात्यांच्या लक्षात आलं. मालिकेचा नायक विनोद खन्नाची व्यक्तिरेखा योग्य तर्‍्हेने साकार करण्यात तो कमी पडला.”
या मालिकेतील भूमिकेसंदर्भात हर्षदकडे विचारणा केली असता तो म्हणाला, “हो, ‘हर मर्द का दर्द’ मालिकेतील नायकाच्या भूमिकेसाठी माझ्याकडे विचारणा करण्यात आली आहे. पण मी त्याबाबत इतक्यातच काही सांगू शकणार नाही.” देहलिज, बेइन्तिहा  यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता हर्षद अरोरा प्रेक्षकांना दिसला होता.  हर्षदने आतापर्यंत सगळ्याच मालिकांमध्ये रोमँटिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याचा खूँखार सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स या मालिकेत डबलरोल होता.  

Web Title: Harshad Arora to take a fresher position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.