हर्ष राजपूतला करायचे आहे या अभिनेत्रीसोबत काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:15 IST2018-08-20T15:10:53+5:302018-08-20T15:15:09+5:30

नजर या मालिकेत अंश राठोडची व्यक्तिरेखा अभिनेता हर्ष राजपूत साकारत आहे. हर्षला बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरबरोबर काम करायची इच्छा आहे.

Harsh Rajput wants to work with this actress | हर्ष राजपूतला करायचे आहे या अभिनेत्रीसोबत काम

हर्ष राजपूतला करायचे आहे या अभिनेत्रीसोबत काम

‘स्टार प्लस’वर ‘नजर’ ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत अंश राठोडची व्यक्तिरेखा अभिनेता हर्ष राजपूत साकारत आहे. हर्षची एक इच्छा त्याने नुकतीच सांगितली आहे. त्याला बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरबरोबर काम करायचे आहे. करिना कपूरच्या अभिनयाच्या तो प्रेमात पडला असून तिच्याबरोबर भूमिका साकारणे हेच त्याचे स्वप्न आहे.

याविषयी हर्ष सांगतो, “अभिनेत्री करिना कपूर सोबत काम करण्याची एक अभिनेता म्हणून माझी तीव्र इच्छा आहे. तिने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका रंगविल्या आहेत आणि कोणत्याही भूमिकेत ती अगदी सहज शिरते. सगळ्याच व्यक्तिरेखांना ती योग्य न्याय देते. ती केवळ एक अप्रतिम अभिनेत्रीच आहे असे नव्हे, तर ती एक स्टायलिश अभिनेत्रीही आहे आणि ती स्वत:ची नवी शैली निर्माण करते. मी अनेक वर्षांपासून तिचे चित्रपट पाहात असून मी तिचा कट्टर चाहता आहे. मी तिचे सर्व चित्रपट पाहिले असून जब वुई मेट हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. त्यात मी तिला गीतच्या भूमिकेत पाहिलं आणि तेव्हाच माझ्या मनात ही इच्छा निर्माण झाली की मला एक ना एक दिवस तिच्याबरोबर भूमिका साकारावयाची आहे. तिच्याबरोबर मला खरोखरच काम करता आले, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन.”

नजर’ ही मालिका अमानवी शक्तींच्या विषयावर असून तिची कथा आधुनिक भारतात घडते. पण त्यात केवळ अमानवी आणि दुष्ट शक्ती यांच्याच कथा नसून त्यात प्रणय आणि कौटुंबिक नात्यांची कथाही गुंफलेली आहे. अंश राठोड (हर्ष राजपूत) हा तसा सामान्य मुलगाच असतो. त्याला आपले खरे आई-वडील कोण आणि त्यांचे काय झाले, याची काहीही कल्पना नसते. त्याचे त्याच्या कुटुंबियांवर प्रेम असते आणि त्याला त्याची आई वेदश्री अतिशय प्रिय असते. त्याच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते हे प्रेक्षकांना नजर या मालिकेत पाहायला मिळत आहे. 

Web Title: Harsh Rajput wants to work with this actress

टॅग्स :Nazarनजर