राणादाला लागला बॉलिवूडचा जॅकपॉट? जॉन अब्राहमबरोबर शेअर केला फोटो, हार्दिकच्या पोस्टची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:21 IST2024-12-19T16:21:19+5:302024-12-19T16:21:56+5:30
हार्दिकला बॉलिवूडचा जॅकपॉट लागलाय की काय, अशी चर्चा रंगली आहे. राणादाची पोस्टच या चर्चेमागचं कारण ठरलं आहे.

राणादाला लागला बॉलिवूडचा जॅकपॉट? जॉन अब्राहमबरोबर शेअर केला फोटो, हार्दिकच्या पोस्टची चर्चा
हार्दिक जोशी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हार्दिकला राणादा या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिकांमधून अभिनयाची खुमखूमी दाखवणाऱ्या हार्दिकने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता हार्दिकला बॉलिवूडचा जॅकपॉट लागलाय की काय, अशी चर्चा रंगली आहे. राणादाची पोस्टच या चर्चेमागचं कारण ठरलं आहे.
राणादाने नुकतीच बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटाला त्याने खास कॅप्शनही दिलं आहे. "सामर्थ्य, आवड आणि चिकाटी याची शिकवण आज जॉन अब्राहम सर या दिग्गजाकडून मिळाली", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. जॉन अब्राहमची भेट घडवून आणल्याबद्दल हार्दिकने फिटनेस ट्रेनर विनोद छन्ना याचे आभार मानले आहेत. जॉन अब्राहम असलेल्या बॉलिवूड सिनेमात हार्दिकची वर्णी लागली का, याबाबत अभिनेत्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण, त्याच्या या पोस्टमुळे तशा चर्चा रंगल्या आहेत.
'तुझ्यात जीव रंगला'नंतर हार्दिक 'तुझेच मी गीत आहे' मालिकेत दिसला होता. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतही त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने 'क्लब ५२', 'रंगा पतंगा', 'लॉकडाऊन लग्न' या सिनेमांतही काम केलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमातही त्याने ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.