लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हार्दिक जोशीने घरी आणली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार, किंमत किती माहितीये का?
By कोमल खांबे | Updated: October 22, 2025 10:08 IST2025-10-22T10:07:55+5:302025-10-22T10:08:40+5:30
मराठी अभिनेता हार्दिक जोशीनेही यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच घरी आणली आहे. हार्दिकने महागडी आणि लक्झरियस अशी नवी कोरी कार खरेदी केली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हार्दिक जोशीने घरी आणली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार, किंमत किती माहितीये का?
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहुर्तावर अनेक जण खरेदी करतात. कोणी सोने घेतं तर कोणी गाडी तर कोणी घरात गृहप्रवेश करतं. सेलिब्रिटीही हा शुभमुहुर्त सोडत नाहीत. मराठी अभिनेता हार्दिक जोशीनेही यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच घरी आणली आहे. हार्दिकने महागडी आणि लक्झरियस अशी नवी कोरी कार खरेदी केली आहे.
हार्दिक जोशीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी घरी आणली आहे. याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. हार्दिकने घेतलेली गाडी ही महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओचं टॉप मॉडेल आहे. या स्कॉर्पिओची किंमत १२ लाखांपासून सुरू होते. तर स्कॉर्पिओचं टॉप मॉडेलची किंमत ही सुमारे १६-१८ लाखांच्या घरात आहे. हार्दिकचं चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदन केलं आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिकला प्रसिद्धी मिळाली होती. हार्दिकने या मालिकेत राणादा ही भूमिका साकारली होती. याच मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर पाठक बाईंच्या भूमिकेत होती. जी आता हार्दिकची रिअल लाइफमध्येही पत्नी आहे. हार्दिक आणि अक्षयाच्या जोडीला चाहतेही पसंत करतात.