कंटेस्टंटचा रोडीज एक्सट्रीम सोबत असा असणार खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:17 IST2018-02-15T11:47:24+5:302018-02-15T17:17:24+5:30

भारतातला पहिला साहसी सत्यकथेवर आधारित कार्यक्रम ते सर्वात जास्त काळ चालणारा साहसी कार्यक्रम,रोड़ीज नी भारतीय दूरचित्रवाहिनीवर रस्ता मोहीम या ...

Hardest journey to be with the extreme extreme of the competition | कंटेस्टंटचा रोडीज एक्सट्रीम सोबत असा असणार खडतर प्रवास

कंटेस्टंटचा रोडीज एक्सट्रीम सोबत असा असणार खडतर प्रवास

रतातला पहिला साहसी सत्यकथेवर आधारित कार्यक्रम ते सर्वात जास्त काळ चालणारा साहसी कार्यक्रम,रोड़ीज नी भारतीय दूरचित्रवाहिनीवर रस्ता मोहीम या संकल्पनेला नवा आयाम दिला. १४ वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर तरुणांचं विश्व असलेला एम टीव्ही आता १५ वा आणि सर्वात दमछाक करायला लावणारा हंगाम घेऊन येत आहे रेनॉ एम टीव्ही रोड़ीज एक्सट्रीम  ज्याचे प्रायोजक आहेत ओप्पो आणि सह प्रायोजक आहेत आय डी शूज आणि ड्युरेक्स. हा सत्यतेवर आधारित कार्यक्रम १५ व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे त्याची यातल्या स्पर्धकांकडून अपेक्षा आहे कि त्यांनी एक पाऊल पुढे टाकावं, बाहेर पडावं आणि त्यांचे सामर्थ्य दाखवावं.सामर्थ्य दाखवणाऱ्या अनेकांच्या तुलनेत स्वतःचं कौशल्य दाखवायची त्याला किंवा तिला मिळालेली ही संधी, रोडीजनी देशातल्या तरुणांना आरसा दाखवायच काम केलाय की ते प्रत्यक्षात कसे आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे.१५ व्या सिझनमध्ये रोड़ीज त्याच्या  प्रेक्षकांना आनंद देईल हे मात्र नक्की.


या हंगामात फक्त दर्शकांसाठी आणि स्पर्धकांसाठीच नाही तर टोळीतल्या सूत्रधारांसाठीही काही गुंतागुंतीच्या आश्चर्यकारक गोष्टी असतील जसं कि बुजुर्ग रोड़ी, रणविजय सिंघा. तो आपल्याला जेव्हा आपल्या कल्पनेपलीकडच्या लोकांना भेटवतो जसं कि साहसी संघ -स्त्री बॉस, नेहा धुपिया, भारतीय दूरचित्रवाहिनीचा सगळ्यांच्या हृदयातला ताईत, प्रिन्स नरुल्ला, या हंगामातील रोड़ीजचा  न्यायाधीश , निखिल चीनप्पा आणि सर्वांचा चाहता, रफ्तार हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर हा उत्कंठावर्धक, साहसी कार्यक्रम सुरु करतायत येत्या रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता.साहसी लोकांसाठी रोड़ीज एक्सट्रीम  हा आनंददायक कार्यक्रम आहे. त्यांचे अधिक लाड पुरवणारा,अधिक खडतर आणि हृदयाचे ठोके चुकवणारा,अविचारी साहसाचा शोध घेणारा.जगण्यासाठी शोध घेणारा या हंगामातील हा कार्यक्रम खऱ्या अर्थानी एक्सट्रीम आहे टोळीतल्या सूत्रधारांसाठी तसेच इतर सहकारी सदस्यांसाठी -अगदी सुरवातीपासून अवघड टप्पा संपेपर्यंत. दुर्धर परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रोड़ीएसचा प्रवास सुरु होईल तो आल्हाददायक ठिकाणांपासून ते खराब हवामानाची स्थिती असलेल्या शिलॉंग, काझीरंगा, भालुकपॉंग, इटानगर,आणि झिरो पर्यंत. जो स्पर्धक मानसिक संतुलन आणि शारीरिक क्षमता दाखवेल तोच आव्हानाचा सामना करेल. अनपेक्षित आश्चर्य शेवटी युद्ध जिंकतील आणि ते रोडीज ठरतील.

रोडीजच्या १५ व्या हंगामाबद्दल बोलताना रणविजय सिंग म्हणाले," एम टीव्ही रोड़ीज हा प्रत्येक हंगामात मला आश्चर्याचे धक्के देत असतो. रोड़ीजच्या पहिल्या हंगामात स्पर्धक म्हणून नंतर टोळीचा नेता आणि आता स्पर्धक आणि सूत्रधारांना नवी आव्हानं देणारा हा प्रवास अतिशय समाधान देणारा आहे. रोड़ीज  हा माझ्या आयुष्यात अतिशय महत्वपूर्ण घटक असून त्यातल्या नाविन्यामुळे प्रत्येक हंगामात मी त्याच्याकडे ओढला जातो. रोड़ीज  आता अशा टप्प्यावर आहे कि त्यामुळे त्यात शक्य असतील तेव्हढी आव्हानं,अवघड वळण ठेवण्याकडे माझा कटाक्ष असेल." 

रोड़ीज हा असा कार्यक्रम आहे जो तरुणांना स्वतःला सिद्ध करायला शिकवतो. वर्षानुवर्षे या कार्यक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मी भारावून गेले आहे.व्यक्तिशः या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे मी प्रभावित झाले आणि मला स्पर्धकांची चिकाटी आवडते. रोडी बनण्याचं स्वप्न ते बघतात आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणतीही कृती करायला तयार होतात.त्यांची हि जिद्द मला आवडते.हा कार्यक्रम उत्कंठा आणि आवड पूर्ण करणारा आहे-जो कुठेतरी  मला साजेसासुद्धा आहे." हे आव्हान स्वीकारणारा टोळीचा सूत्रधार निखिल चिनाप्पा म्हणाला," असे मोजकेच कार्यक्रम आहेत जे देशाची निष्ठा,पत सांभाळणारे आहेत.गेल्या १४ वर्षात खूप बदल झाले एकच गोष्ट कायम राहिली ती म्हणजे या कार्यक्रमावर लोकांचं असलेलं प्रेम आणि आवड ज्यामुळे हा कार्यक्रम एव्हढी वर्ष सुरु आहे.हे वर्ष या कार्यक्रमासाठी महत्वाचा पाडाव असल्यामुळे हा कार्यक्रम  नक्कीच अधिक भव्य,चांगला असेल."रोड़ीजबद्दल प्रिन्स नरुल्ला म्हणाला," आज मी जो काही आहे त्याचा सगळं श्रेय मी रोड़ीजला देतो.मी एका नव्या उत्साहाने परत आलोय ते हा खेळ जिंकण्याच्या हेतूने. मी असा आहे ज्याला आव्हान स्वीकारायला आवडतं आणि रोड़ीजच्या या एक्सट्रीम हंगामाचा मी महत्वाचा घटक आहे."रोडीजवर मितभाष्य करताना रफ्तार म्हणाला," रोड़ीजचे अनेक तरुण चाहते आहेत आणि अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद होतो जो तरुणांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या क्षमतांची त्यांना जाणीव करून देतो. या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे इतर सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची मलाही खूप उत्सुकता आहे."




Web Title: Hardest journey to be with the extreme extreme of the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.