अवंती चे गाणे झाल्यावर गुरुदास मान लगेच स्टेजवर आले आणि एकदम तिला नमस्कार केला. त्यामुळे उपस्थित सगळे एकदम अवाक झाले होते.
गुरदास मान यांनी अवंती पटेलच्या गाण्याला अशाप्रकारे दिली दाद
ठळक मुद्देअवंतीने सादर केले ‘मला जाऊ द्याना घरी' गाणे गुरुदास मानने लावली इंडियन आयडॉल 10 शोमध्ये हजेरी
मुंबईची मुलगी, अवंती पटेल आपल्या प्रभावी आवाजाने आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील 'इंडियन आयडॉल 10'च्या टप्प्यावरच्या अतुलनीय कामगिरीसह सगळ्यांची मने जिंकत आहे. ह्या 'इंडियन आयडॉल 10' मध्ये प्रसिद्ध गायक गुरदास मान आले होते. गुरुदास मान यांनी पंजाबी लोकसंगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले आहे. अवंतीच्या गाण्याने प्रभावित होऊन गुरुदास मान चक्क तिच्या पाया पडले. तिच्या गाण्याने ते इतके प्रभावित झाले कि, अवंती चे गाणे झाल्यावर गुरुदास मान लगेच स्टेजवर आले आणि एकदम तिला नमस्कार केला. त्यामुळे उपस्थित सगळे एकदम अवाक झाले आणि तिच्यासाठी सुद्धा हा सुखद धक्का होता. तिने गुरदास मान ह्यांचा आशीर्वाद घेतला.
अवंतीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती म्हणाली, "हा क्षण माझ्यासोबत आयुष्यभर राहील. मला गुरुदास मान यांनी दिलेल्या या अगत्यपूर्ण आणि सन्माननीय वागणुकीने सुखद धक्का बसला आहे. मी अजून त्यातून सावरते आहे. गुरुदासजींच्या नम्रता, सकारात्मकता आणि प्रोत्साहन या गुणांनी मी भारावले आहे, जे विसरणे शक्य नाही. मी 'इंडियन आयडॉल 10' ची खूप आभारी आहे ज्याने मला इतके आश्चर्यकारक क्षण दिले ज्याची मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. "
संगीत ही अशी एक भाषा आहे जी जगातील इतर कोणत्याही भाषांपेक्षा जास्त भावना पोहचवते. म्हणूनच जेव्हा अवंतीने मराठीतील ‘मला जाऊ द्याना घरी' सादर केले, तेव्हा गुरदास मान आनंदित झाले आणि केवळ तिची स्तुती केली नाही तर त्यांनी संगीतावरील प्रेम दाखण्यासाठी स्टेजवर आले. या शनिवार व रविवार 'इंडियन आयडॉल 10'चे स्पर्धक भारताच्या विविध रंगांचा उत्सव साजरा करतील आणि प्रत्येक स्पर्धक एका वेगळ्या राज्याच्या लोकगीत गाईल.
Web Title: Gurdas Mann gave appriciation to Avanti Patel in Indian Idol 10