श्रेयस तळपदे आणि गिरिजा ओक या भूमिकेत झळकणार गुलमोहरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 16:54 IST2018-01-19T11:24:09+5:302018-01-19T16:54:09+5:30
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवावरील 'गुलमोहर 'या ...

श्रेयस तळपदे आणि गिरिजा ओक या भूमिकेत झळकणार गुलमोहरमध्ये
म ाठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवावरील 'गुलमोहर 'या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस हा अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयश आणि गिरिजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही अनेक मालिका आणि सिरीयलमध्ये आजवर काम केले आहे. मात्र आजपर्यंत दोघांनीही एकत्र काम केले नव्हते. गुलमोहर या छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर आधारित मालिकेत प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ३० वर्षांच्या स्ट्रगलिंग अॅक्टरच्या भूमिकेत श्रेयस झळकणार आहे. तो वेगवेगळ्या ऑडिशन्स देत फिरत असतो. त्याचे बाबा ड्रायव्हर असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पण या सगळ्यात खचून न जाता त्याचे आयुष्य जगण्याचे एक ब्रीद वाक्य आहे. 'सतत हसायचं आणि हसवायचं'- स्माईल प्लीज. एक असा तरुण जो कोणत्याही परिस्थितीत हसणं सोडत नाही आणि इतरांना हसवायला सुद्धा असा या मालिकेचा सार आहे. झी युवावरील गुलमोहर या दोन एपिसोडच्या मालिकेतील पहिल्या कथेत श्रेयस आणि गिरिजाची स्माईल प्लिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कोणतेही नाते टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचे असते, ते त्या नात्यात असणारे प्रेम. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचे असो, आई मुलाचे किंवा नवरा बायकोचे. नातेसंबंध आणि त्यात असणारे प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून झी युवा गुलमोहर या मालिकेद्वारे घेऊन येत आहे. या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे अनेक आवडते कलाकार झी युवाच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. स्माईल प्लिज गुलमोहर या मालिकेतील पहिली कथा असून श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक गोडबोले यांचे प्रेम आणि प्रेमापेक्षाही अतिशय वेगळ्या दर्जाचे बॉण्डिंग या कथेद्वारे उलगडत जाईल. या कथेत उदय सबनीस आणि उदय टिकेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.