कपिल शर्माच्या फॅन्ससाठी गुडन्यूज, लवकरच परतणार कॉमेडी किंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 10:46 IST2017-09-15T05:15:30+5:302017-09-15T10:46:11+5:30

कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुडन्यूज आहे. कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा परततो आहे. सोनी एंटरटेनमेंटवर कपिलचा शो लवकरच ...

Gudnews for Kapil Sharma's Fans, Comedy King Coming Soon! | कपिल शर्माच्या फॅन्ससाठी गुडन्यूज, लवकरच परतणार कॉमेडी किंग !

कपिल शर्माच्या फॅन्ससाठी गुडन्यूज, लवकरच परतणार कॉमेडी किंग !

िल शर्माच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक गुडन्यूज आहे. कपिल शर्माचा शो पुन्हा एकदा परततो आहे. सोनी एंटरटेनमेंटवर कपिलचा शो लवकरच सुरु होणार असल्याचे कळते आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा शो बंद करण्यात आला होता. मात्र आता असे कळतेय हा शो पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माने हे आधीच सांगितले होते की शो फक्त काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. माझी तब्येत ठिक नसल्यामुळे शो काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. लवकरच आम्ही परत येऊ. कपिलला ब्लड प्रेशरचा त्रास होता. ज्याच्या उपचारासाठी तो बंगळुरुला गेला होता. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शो करण्यासाठी तो तयार झाला आहे. पुढच्या महिन्यांपासून तो शोची शूटिंग सुरु करणार असल्याचे कळतेय. 

गेल्या 3 महिन्यात बिघडलेल्या स्वास्थामुळे कपिलचा शो तब्बल सहा वेळा रद्द करण्याची वेळ आली होती. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, अजय देवगण हे कपिलच्या सेटवर प्रमोशनसाठी आले असताना त्यांना शूट न करताच परतावे लागले होते. त्यानंतर सोनी टीव्हीच्या अधिकाऱ्यांनी आणि कपिल शर्माने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. कपिलच्या फॅन्सना सोनीने अजिबात निराश नाही केले. कपिलचा शो बंद झाल्यावर चॅनलने 8 वाजता कपिलचे जुने एपिसोड दाखवण्यात आले. आता आपल्या नव्या इनिंगसोबत कपिल शर्मा परत तो आहे.  

ALSO READ : OMG!! कपिल शर्माचा शो सोडून गेल्याने दादी, चंदू आणि डॉक्टर गुलाटीचे झाले लाखोंचे नुकसान !

कपिलच्या शोची टीआरपी गेल्या अनेक दिवसांपासून ढासळत होती. सूत्रांच्या माहितीनुसार कपिल डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे वारंवार त्याला शोच्या शूटिंग दरम्यान रुग्णालयात दाखल करण्याची वेळ यायची आणि शूट रद्द करावे लागायचे. परिणामी सोनी आणि कपिलने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमात कपिल कामाला लागला आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स शो परतण्याची वाट मोठ्या आतुरतेने बघत असतील यात काही शंका नाही. 

Web Title: Gudnews for Kapil Sharma's Fans, Comedy King Coming Soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.