गुडबाय टू करण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:09 IST2016-10-10T11:30:12+5:302016-10-17T10:09:40+5:30

बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत शानची भूमिका साकारणाऱ्या करण व्ही ग्रोव्हरने या मालिकेला नुकताच रामराम ठोकला आहे. करणला चित्रपटाची ...

Goodbye to Karan | गुडबाय टू करण

गुडबाय टू करण

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत शानची भूमिका साकारणाऱ्या करण व्ही ग्रोव्हरने या मालिकेला नुकताच रामराम ठोकला आहे. करणला चित्रपटाची ऑफर आल्यामुळे त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने या मालिकेतील त्याच्या अखेरच्या दृश्याचे नुकतेच चित्रीकरण केले. या चित्रीकरणानंतर करणसाठी त्याच्या सहकलाकारांनी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये सगळ्यांनी खूप सारी मजा मस्ती केली. पण करणला निरोप देताना अनेकजण भावूक झाले होते. याविषयी वाहबिझ दोराबजी सांगते, "मी आणि करण गेल्या आठ वर्षांपासून चांगले मित्रमैत्रीण आहोत. पण या मालिकेमुळे मला त्याला अधिक जाणून घेता आहे. तो एक मित्र म्हणूनच नव्हे तर एक सहकलाकार म्हणूनही खूप चांगला असल्याचे मला या मालिकेमुळे कळले" तर पल्लवी प्रधान सांगते, "मला वजन कमी करण्यासाठी करणनेच प्रोत्साहन दिले. तो मला सतत खाण्याच्या बाबतीत टिप्स देत असतो. त्याला मी खूप मिस करणार आहे." 

Web Title: Goodbye to Karan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.