'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर..! आता हास्यजत्रा दिसणार ४ वार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:23 IST2023-03-28T15:22:21+5:302023-03-28T15:23:05+5:30
Maharashtrachi Hasyajatra : टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर..! आता हास्यजत्रा दिसणार ४ वार!
महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम ओळखला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतात. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतात. प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी अशी आहे की, आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चार दिवस पाहता येणार आहे. म्हणजेच आता ४ वार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. आता हे मनोरंजन ३ एप्रिलपासून प्रत्येक आठवड्यात चार दिवस होणार आहे, म्हणजेच आता प्रेक्षकांसाठी हास्याचा चौकार घेऊन येतो आहोत. आता नवनवीन प्रहसनांतून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
निवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दाद, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं मार्मिक परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, चेतना, शिवली, पृथ्वीक, ओंकार, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय ह्यांमुळे निखळ मनोरंजन होतं. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार, हास्याचा चौकार! सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.