गोंडस आर्यन मेघजी 'कुलस्वामिनी' मालिकेत चमकतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 18:09 IST2017-09-18T12:33:02+5:302017-09-18T18:09:32+5:30

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'कुलस्वामिनी' या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका ...

Gondas Aryan Meghaji shines in the series 'Kulaswamini' | गोंडस आर्यन मेघजी 'कुलस्वामिनी' मालिकेत चमकतोय

गोंडस आर्यन मेघजी 'कुलस्वामिनी' मालिकेत चमकतोय

टार प्रवाहवरील लोकप्रिय 'कुलस्वामिनी' या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनं मालिकेच्या कथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'कुलस्वामिनी' मालिकेत आरोही देवधर कुटुंबात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या या प्रयत्नांना कुटुंबातूनच विरोध होत आहे. सुवर्णा, साक्षी आणि श्रेया आरोहीच्या प्रयत्नांना खिळ घालत आहेत. त्या तिला काही ना काही कारस्थानं करून त्रासही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, छोटा 'मयूर' या कुटुंबात दाखल होतो आणि आरोहीच्या बाजूने उभा राहतो.अनेक जाहिराती आणि मालिकांमध्ये चमकलेला आर्यन मेघजी हा बालकलाकार आरोहीच्या मानलेल्या भावाची भूमिका साकारत आहे. आर्यननं आजवरच्या कामातून उत्तम अभिनयाचा ठसा उमटवला आहे.आता तो आरोहीच्या भावाची भूमिका किती प्रभावी करतो, त्याच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कोणतं वेगळं वळण घेणार, हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल. ८ वर्षीय आर्यनच्या एंट्रीमुळे कुलस्वामीनी सेटवरचे वातावरण अधिक खेळकर झालं आहे. छोट्या आर्यनच्या अभिनयासाठी आणि दमदार कथानक असलेल्या या मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कुलस्वामिनी ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरू लागली आहे. रेणुका मातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. या मालिकेत संग्राम साळवी राजस देवधर ही भूमिका साकारतो आहे. राजसच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहे. लहानपणीच त्याची आई गेली. वडिलांशी त्याचे कधी पटलेच नाही आणि वडिलांनी त्याला कधी समजूनही घेतले नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो नेहमी वागतो. मात्र, त्याच्या मनात मायेचा ओलावाही आहे. संग्रामला 'राजस बोलला, विषय संपला' असा खणखणीत संवाद मिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत.मालिकेचे लेखक शिरीष लाटकर सांगतात, 'राजस ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडत आहे. प्रत्येक गोष्टीला तो थेट भिडणारा आहे. त्याच्या मनात एक आणि ओठावर एक असे काहीही नाही. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेसाठी काहीतरी तकिया कलाम असावा असे वाटत होते. त्यातूनच 'राजस बोलला, विषय संपला' हा संवाद सुचला. या संवादाने ही व्यक्तिरेखा अजून उठावदार झाली आहे. संग्रामने त्याच्या खास शैलीत ही व्यक्तिरेखा अधिक फुलवली आहे.'

Web Title: Gondas Aryan Meghaji shines in the series 'Kulaswamini'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.