गणपती बाप्पा मोरया या मालिकेत उलगडली जाणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 15:19 IST2017-01-23T09:49:14+5:302017-01-23T15:19:14+5:30

संपूर्ण जग ज्याला आराध्यदैवत मानते तो गणपत्तीबाप्पा सगळ्यांचेच लाडके देैवत आहे. या गाणपती बाप्पावर आधारित असलेली 'गणपती बाप्पा मोरया' ...

Goddess Parvati's reincarnation story will be unveiled in this series of Ganapati Bappa Moria | गणपती बाप्पा मोरया या मालिकेत उलगडली जाणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा

गणपती बाप्पा मोरया या मालिकेत उलगडली जाणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा

पूर्ण जग ज्याला आराध्यदैवत मानते तो गणपत्तीबाप्पा सगळ्यांचेच लाडके देैवत आहे. या गाणपती बाप्पावर आधारित असलेली 'गणपती बाप्पा मोरया' ही पौराणिक मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयासोबतच या मालिकेच्या भव्य सेटचीदेखील सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेचा सेट बनवताना प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. या सेटवरील प्रत्येक गोष्ट लोकांच्या पसंतीस उतरावी यासाठी प्रत्येक गोष्ट बारकाईने केली गेली आहे.
गणपती बाप्पा मोरया या मालिकेत गणपती बाप्पाच्या आयुष्याच घडलेल्या बारीकसारीक गोष्टीदेखील आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रेक्षकांना एक खूप छान गोष्ट पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत प्रेक्षकांना शिव पार्वतीचा पुनर्विवाह पाहायला मिळणार आहे आणि हा विवाह श्री गणेशाच्या साक्षीने संपन्न होणार आहे. त्याचसोबत प्रेक्षकांना आदिशक्ती पार्वतीच्या पुर्नजन्मासोबतच सती जन्मातील गणेशाच्या ओंकार रूपाचे सत्यदेखील जाणता येणार आहे. ही गोष्ट पाहातना प्रेक्षकांना मजा येणार यात काही शंकाच नाही. 
शीव पार्वतीच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव श्रीगणेशाने मांडला असून तो आता पूर्णत्वास येणार आहे. या सोहळ्यात अनेक अडथळे येणार असून त्यातून मार्गदेखील काढला जाणार आहे. पण हे सगळे होत असताना एक महान गाथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या पुनर्विवाहातून प्रेक्षकांना पार्वतीच्या पुर्नजन्माची म्हणचेच दक्ष कन्या सतीची कथा पाहायला मिळणार आहे. 
गणपती बाप्पा मोरया या मालिकेत प्रेक्षकांना आतापर्यंत कोजागिरी, मनसाची कथा पाहायला मिळाली होती. 
या मालिकेत गणेशाला शिवायलात एक सुखद आणि अनपेक्षित धक्का मिळाल्याचे आपल्याला नुकतेच पाहायला मिळाले आहे. गणेशाचे आजोबा हिमालय आणि आजी मैनावरी सर्वांचे कुशल मंगल जाणून घ्यायला शिवालयात आले आहेत. 



Web Title: Goddess Parvati's reincarnation story will be unveiled in this series of Ganapati Bappa Moria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.