देव आणि सोनाक्षीमध्ये दुरावा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:57 IST2016-08-12T08:27:26+5:302016-08-12T13:57:26+5:30
छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जोडी देव आणि सोनाक्षीच्या लवस्टोरीत एक ट्विस्ट येणार आहे. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ...

देव आणि सोनाक्षीमध्ये दुरावा ?
छ ट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जोडी देव आणि सोनाक्षीच्या लवस्टोरीत एक ट्विस्ट येणार आहे. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत या दोघांमध्ये प्रेमांकुंर फुलू लागले असतानाच अचानक दोघंही एकमेकांपासून दुरावणार आहेत. कारण देवची आई म्हणजेच ईश्वरी (सुप्रिया पिळगावकर) आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. मात्र त्या मागचं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोनाक्षीचे आई-वडिल देवच्या घरी येऊन ईश्वरीला देव-सोनाक्षी तीन महिन्यांपासून प्रेमात असल्याचं सांगतात. आपल्या लेकानं ही बाब आपल्यापासून लपवून ठेवल्याचं शल्य ईश्वरीच्या मनात घर करुन राहतं. त्यामुळं तिला झोपही लागत नाही. अखेर झोप यावी म्हणून ईश्वरी झोपेच्या गोळ्या घेते. मात्र त्या गोळ्याच्या अतिसेवनामुळं ईश्वरीला चक्कर येते आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं. सोनाक्षीमुळं आपली आई तणावात असल्याचं वाटल्यानं तिच्या आनंदासाठी देव सोनाक्षीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. मात्र यामुळं सोनाक्षी आणि या दोघांचे फॅन मात्र दुखावले जाणार आहेत.