​चक्रव्यूहमध्ये महिमा मकवाणाची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 10:24 IST2017-06-09T04:54:11+5:302017-06-09T10:24:11+5:30

चक्रव्यूह या मालिकेत एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री, संगीता घोषसारखे कलाकार आपल्याला ...

Glory Entree entry in Chakravyuh | ​चक्रव्यूहमध्ये महिमा मकवाणाची एंट्री

​चक्रव्यूहमध्ये महिमा मकवाणाची एंट्री

्रव्यूह या मालिकेत एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री, संगीता घोषसारखे कलाकार आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. नारायणी शास्त्रीने क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा, कुसुम, पिया का घर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी ती पिया रंगरेझ या मालिकेत झळकली होती आणि आता ती चक्रव्यूह या मालिकेत सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर संगीता घोषने मेहंदी तेरे नाम की, देस में निकला होगा चाँद, कहता है दिल जीले जरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांचे नेहमीच कौतुक केले जाते. आता ती चक्रव्यूह या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चक्रव्यूह या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत माय-लेकींमधील कडवट कथा गुंफण्यात आली असून या मालिकेचे कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. महिमा मकावाणाने आतापर्यंत बालिकावधू, सपने सुहाने लडकपन के, अधुरी कहानी हमारी, दिल की बाते दिल ही जाने यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. चक्रव्यूह या मालिकेत महिमा प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत अनामी ही भूमिका साकारणार आहे. ती आपल्या सावत्र पालकांचा अतिशय आदर करते. तसेच ती एक आनंदी, खेळकर मुलगी आहे. पण या 17 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील काही रहस्य कळल्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे.
अगदी बाळ असतानाच पालकांनी त्याग केलेल्या एका मुलीची कथा आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ती आपल्या सावत्र पालकांकडून प्रेमाची अपेक्षा करत आहे. पण तिला नेहमीच समाजात दुय्यम वागणूक दिली जाते. ही एक खूप सशक्त भूमिका असून महिमा ती चांगल्या प्रकारे साकारेल अशी या मालिकेच्या टीमची खात्री आहे. 

Web Title: Glory Entree entry in Chakravyuh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.