गिरिजा पुन्हा छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:11 IST2016-10-10T10:37:10+5:302016-10-17T10:11:58+5:30
लज्जा या मालिकेत गिरिजा प्रमुख भूमिकेत झळकली होती. गिरिजाने लग्न केल्यानंतर ती खूपच कमी चित्रपट, मालिकेत काम करते. दोन ...

गिरिजा पुन्हा छोट्या पडद्यावर
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">लज्जा या मालिकेत गिरिजा प्रमुख भूमिकेत झळकली होती. गिरिजाने लग्न केल्यानंतर ती खूपच कमी चित्रपट, मालिकेत काम करते. दोन स्पेशल हे तिचे जितेंद्र जोशीसोबतचे नाटक खूपच गाजत आहे. गेल्या काही वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासूनही दूर आहे. पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे. ग सहाजणी या पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत ती झळकणार आहे. ही मालिका बँकमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असते. रोजच्या जीवनातील दगदग, समस्या यांवर मात करणाऱ्या काही महिलांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नोकरीवर जाणाऱ्या महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेत गिरिजा विद्या विसपुते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेत गिरिजासोबत शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोंडवळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.