करणने दिले कपिलला गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 20:14 IST2016-11-22T20:10:17+5:302016-11-22T20:14:59+5:30
टीव्ही जगतात सर्वाधिक चर्चेत असलेला हास्यअभिनेता कपिल शर्मा सध्या भलताच खुश आहे. कारण दिग्दर्शक करण जोहर याने त्याला चक्क ...

करणने दिले कपिलला गिफ्ट
ट व्ही जगतात सर्वाधिक चर्चेत असलेला हास्यअभिनेता कपिल शर्मा सध्या भलताच खुश आहे. कारण दिग्दर्शक करण जोहर याने त्याला चक्क एक गिफ्ट दिले आहे. याचा खुलासा खुद्द कपिलनेच ट्विटरवरून केला आहे.
त्याचे झाले असे की, करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये कपिलला आमंत्रित करण्यात आले होते. अर्थातच त्यामुळे या शो जबरदस्त एंटरटेनिंग झाला असेल. करण आणि कपिलने शोमध्ये खूप धमाल केली आहे. याचा खुलासा करताना कपिलने ट्विटरवर लिहिले की, ‘धन्यवाद करण जोहर सर! तुमच्या हिट शोमध्ये आमंत्रित केल्याबद्दल व मला एक चांगले गिफ्ट दिल्याबद्दल... कपिलने हॅशटॅगमध्ये ‘कॉफी विद करण’ असेही लिहिले. बºयाचशा अॅवॉर्ड शोमध्ये कपिलने करणसोबत होस्टिंग केले आहे. टीव्हीवर देखील दोघांमध्ये चांगली ट्यूनिंग बघावयास मिळते.
दरम्यान करणने यावेळेस शोमध्ये अनोख्या जोड्या आमंत्रित केल्या आहेत. यात अर्जून कपूर आणि वरून धवन तसेच रणबीर कपूर आणि रणवीर सिंह अशा जोड्या बघावयास मिळणार आहेत. यावेळचा शो आगळ्या वेगळ्या पद्धतीचा असेल याचे अगोदरच संकेत दिले गेल्याने प्रेक्षकांमध्ये शोबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. असो आता या शोची फॅन्सला प्रतिक्षा असून, कपिलने आपल्या नेहमीच्याच शैलीत शोमध्ये धमाल केली की आणखी काय? असा फॅन्सला प्रश्न पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर याचे प्रचिती येत असून, कपिलच्या ट्विटला फॅन्सकडून रिट्विट करून शोबद्दल विचारले जात आहे. मात्र कपिलने फॅन्सची उत्सुकता वाढविताना ‘वेट अॅण्ड वॉच’ सूचक उत्तर दिले आहे.
![]()