​घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 12:22 IST2017-12-26T06:52:31+5:302017-12-26T12:22:31+5:30

“घाडगे & सून” ही मालिका सुरू होेऊन काहीच महिने झाले असले तरी प्रेक्षकांना ही मालिका, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा ...

In the Ghadge & Soon series, Akshay and Amrita go to Honeymoon! | ​घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!

​घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!

ाडगे & सून” ही मालिका सुरू होेऊन काहीच महिने झाले असले तरी प्रेक्षकांना ही मालिका, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा खूप आवडत आहेत. या मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताचे लग्न होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या दोघांना एकमेकांसोबत राहाण्याची इच्छा नाहीये. त्यामुळे आपल्याला घटस्फोट कसा मिळवता येईल आणि त्यासाठी सगळ्यांना कसे तयार करता येईल याचे प्लनिंग हे दोघे मिळून करत आहेत. अक्षय आणि अमृता घाडगे परिवारातील सदस्यांना त्यांच्या नात्यामध्ये किती प्रोब्लेम सुरू आहेत हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्या घटस्फोटसाठी लवकरात लवकर त्यांच्या घरच्यांनी सहमती द्यावी यासाठी ते प्रयत्न करत आहे. पण आता त्यांचे भांडण मिटविण्यासाठी माईंनी अमृता आणि अक्षयला एक सरप्राईझ देणार आहेत. हे सरप्राईझ म्हणजे त्या या दोघांना हनिमुनचे पॅकेज देणार आहेत. माई दोघांना आता केरळला पाठवणार आहेत. हे ऐकून अमृता आणि अक्षयसमोर एक वेगळेच संकंट उभे राहिले आहे. माईंना नकार देणे हे त्यांच्यासाठी अशक्य आहे आणि त्यांना हनिमूनला देखील जायचे नाही. त्यामुळे या द्विधा मनस्थितीमध्ये हे दोघेही अडकले आहेत. तर दुसरीकडे अर्जुन कियाराशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामध्ये अमृता-अक्षय हनिमूनला जायचे कसे टाळणार? घटस्फोट मिळविण्यासाठी अक्षय अमृताचे जे प्रयत्न सुरू आहेत ते माईना आणि घरच्यांना कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना “घाडगे & सून” या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
घाडगे सदन मध्ये अक्षय आणि अमृता हनिमूनला जाणार हे कळल्यापासून शॉपिंगची तयारी सुरू झाली आहे. लग्नानंतर ते दोघेही पहिल्यांदाच कुठे तरी बाहेर जाणार आहेत. त्यामुळे घरामधील सगळेच त्यांना चिडवत आहेत. आता अक्षय अमृता खरोखरच हनिमूनला जातील का? या संकटामधून ते दोघे कसे मार्ग काढतील हे बघणे गंमतीशीर असणार आहे. हनिमून प्लनिंगमुळे मालिकेमध्ये आणि अक्षय–अमृताच्या नात्यामध्ये कोणते नवे वळण येईल हे प्रेक्षकांना “घाडगे & सून” या मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : घाडगे & सून मालिकेतील चिन्मय उद्गिरकर, सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमयेचा फोटो सोशल मीडियावर हिट

Web Title: In the Ghadge & Soon series, Akshay and Amrita go to Honeymoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.