द्रष्टीच्या भेटीला जर्मन फॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 13:44 IST2016-10-20T13:42:38+5:302016-10-20T13:44:44+5:30

अभिनेत्री द्रष्टी धामीच्या भेटीला एक अनाहूत फॅन आली. सध्या द्रष्टीच्या 'परदेस में हैं मेरा दिल' या मालिकेचे ऑस्ट्रियामध्ये शुटिंग ...

German fan in the meeting to meet! | द्रष्टीच्या भेटीला जर्मन फॅन !

द्रष्टीच्या भेटीला जर्मन फॅन !

िनेत्री द्रष्टी धामीच्या भेटीला एक अनाहूत फॅन आली. सध्या द्रष्टीच्या 'परदेस में हैं मेरा दिल' या मालिकेचे ऑस्ट्रियामध्ये शुटिंग सुरु आहे. या शुटिंगच्या वेळी अचानक एका 65 वर्षीय जर्मन महिला फॅननं द्रष्टीला भेटण्यासाठी हजेरी लावली. ही महिला द्रष्टीची मोठी फॅन असून तिला भेटण्यासाठी सात तासांचा विमान प्रवास करुन आपल्या नातवासह ती जर्मनीहून ऑस्ट्रियात दाखल झाली. ही खास फॅन एवढ्यावरच थांबली नाही. तिने द्रष्टीसाठी खास गिफ्ट आणि शॉपिंग व्हाऊचरही दिले. या जर्मन फॅनचे प्रेम पाहून द्रष्टी चांगलीच भारावली. आपल्या भेटण्यासाठी या महिलेने घेतलेले कष्ट पाहून थक्क झाल्याची  प्रतिक्रिया द्रष्टीने दिली आहे. जर्मनीहून तिच्या नातवासह तब्बल  7 तासांचा प्रवास करून दृष्टीला भेटण्यासाठी ती आली होती. ही फॅन काही वर्षांपूर्वी भारतात आली होती.तेव्हाही तिला द्रष्टीला भेटण्याची खूप इच्छा होती.मात्र त्यावेळी ती पूर्ण होऊ शकली नाही.तसेच तिच्या बुटीकमधून तिला द्रष्टीला नववधूचा पोशाखही गिफ्ट देण्याची इच्छाही तिने बोलून दाखवली.या मालिके आधी द्रष्टीने दिल मिल गयें,गीत -हुआ सबसे पराई,मधुबाला-एक इश्क एक जुणून,एक था राजा एक थी रानी यासारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.

Web Title: German fan in the meeting to meet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.