गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून करते पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:42 IST2018-08-03T11:40:46+5:302018-08-03T11:42:37+5:30

'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावे विक्रम सरंजामेची भूमिका साकारणार आहे. 

Gayatri Datar Makes A Debut With Subodh Bhave In 'Tula Pahte Re' Tv Serial | गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून करते पदार्पण

गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून करते पदार्पण

प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात हे रिल असो किंवा मग रिअर असे अनेक जोडपे आहेत ज्यांच्या वयात अनेक वर्षांचे अंतर असून लग्नबंधनात अडकले आहेत. तोच धागा पकडून छोट्या पडद्यावर  'तुला पाहते रे' ही मालिका १३ ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीस येणार आहे.

वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी असलेली  'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे.तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेत त्याने कमबॅक केले आहे. 'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावे विक्रम सरंजामेची भूमिका साकारणार आहे. 

ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. यातील ईशाची भूमिका नवोदित अभिनेत्री गायत्री दातार साकारणार आहे.पुण्याची गायत्री या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्याचं ध्येय तिने ठेवले आहे.या मालिकेचे प्रोमो सध्या टीव्हीवर झळकत आहेत.या प्रोमोतून अजब लग्नाची गजब गोष्ट पाहायला मिळणार हे आतापर्यंत रसिकांना समजलं आहे.

तिच्या या पदार्पणाविषयी बोलताना गायत्री म्हणाली, "या मालिकेतून मी पदार्पण करत आहे आणि पदार्पणातच सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायची सुवर्णसंधी मिळाली याचा मला आनंद आहे. मी या मालिकेत इशा या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचं पात्र साकारते आहे जी खूप मेहनती आहे. इशा ही तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे. मी अशा करते कि रसिकांना माझी व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल."

गेल्या काही वर्षांमध्ये सुबोध भावेने उत्तमोत्तम चित्रपट करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता तो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'तुला पाहते रे' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून आता पुन्हा सुबोध भावेला अविनाश देव नंतर विक्रम सरंजामे ही विविध पैलू असलेली भूमिका साकारताना छोट्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. ही मालिका लवकरच झी मराठी या वाहिनीवर दाखल होणार आहे.

याआधी मालिकेत तो अवघाची संसार,रिमझिम, 'का रे दुरावा' यासारख्या मालिकेत सुबोधच्या भूमिकेला रसिकांनी भरघोस पसंती दिली होती.'का रे दुरावा मालिकेत' या मालिकेतील अविनाश देव या भूमिकेतून सुबोध भावेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. बाहेरून स्वभावाने कडक पण अगदी हळव्या मनाचा बॉस अविनाश देव म्हणजे अभिनेता सुबोध भावेने साकारला होता.

Web Title: Gayatri Datar Makes A Debut With Subodh Bhave In 'Tula Pahte Re' Tv Serial