"गौरव मोरे व्हायचं म्हणजे खूप अपमान सहन करावा लागतो! Video पाहून अनेकांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:19 IST2025-08-21T12:18:31+5:302025-08-21T12:19:21+5:30
गौरव मोरे स्पेशल स्किट, 'चला हवा येऊ द्या' मध्ये सगळ्यांना हसवणाऱ्या गौरवचेही डोळे पाणावले

"गौरव मोरे व्हायचं म्हणजे खूप अपमान सहन करावा लागतो! Video पाहून अनेकांचे डोळे पाणावले
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे (Gaurav More) सध्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) च्या नवीन पर्वात दिसत आहे. यावेळी चला हवा येऊ द्यामध्ये सामान्यांना स्किट्स करण्याची संधी देण्यात आली आहे. तर श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके हे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. तसंच त्यांचेही स्किट्स मध्येमध्ये पाहायला मिळतात. नुकतंच एका स्किटमध्ये काही कलाकारांनी गौरव मोरेचं वर्णन केलं. जे ऐकून गौरवसह सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं.
'चला हवा येऊ द्या'च्या नवीन एपिसोडची झलक झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये एका स्किटमध्ये काही डायलॉग आहेत जे ऐकून गौरव मोरे भावुक झाला आहे. 'गौरव मोरे व्हायचं म्हणजे खूप अपमान सहन करावा लागतो. त्याच्यासाठी जिगरा लागतो तो त्याच्याकडे आहे. आमच्यासारख्यांकडे नाही रे बाबा.गौरवमुळे दहा बाय दहा मधला मुलगाही सुपरस्टार होण्याचे स्वप्न बघू शकतो. गौरव मोरे बनायला वाघाचं काळीज लागतं. खोटे खोटे सोड मोठ मोठे अपमानही पचवावे लागतात.' अशा आशयाचं स्किट गौरव मोरेला समर्पित करण्यात आलं. जे पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
गौरव मोरे ठाण्यातील छोट्याशा फिल्टरपाड्यातून आला आहे. आपल्या टॅलेंटने त्याने वेगळं स्थान निर्माण केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने त्याला तो प्लॅटफॉर्म दिला. 'अरे बच्ची','फिल्टरपाड्याचा बच्चन','टा ना ना ना' असे त्याचे डायलॉग खूप गाजले. मात्र त्याला काही ठिकाणी अपमानही सहन करावा लागला. 'चला हवा येऊ द्या'मधील या स्किटमधून गौरवला ट्रिब्यूट देण्यात आला.