/>'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.मालिकेतील सगळ्याच व्यक्तीरेखा मालिकेमुळे खूप लोकप्रिय झाल्या आहेत.गुरुनाथ, राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे.प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे.संजना असे या व्यक्तीरेखेचे नाव असून ही भूमिका मीरा जगन्नाथ हिने साकारली आहे.खरंतर संजनाच्या एंट्रीनंतर मालिकेला आता अधिक रंजक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण संजनाची एंट्री होताच पत्नी राधिकाला सोडून शनायावर लट्टु झालेला गॅरी संजनाला पाहताच तिच्यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे आगामी काळात शनायाचा पत्ता कट होणार आणि संजनाची गुरूनाथच्या आयुष्यात एंट्री होणार हा ट्रॅक लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गॅरी म्हणजेच गुरुनाथ ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर याने साकारली आहे. तरा राधिका ही भूमिका अनिता दातेने साकारली आहे.शनाया ही भूमिका रसिका सुनीलने साकारली आहे.माझ्या नव-याची बायको या मालिकेत गुरुनाथचे त्याची पत्नी राधिकासोबत पटत नसल्याचे दाखवण्यात आले आहे. राधिकाला सोडून तो शनायाच्या मागे असतो. ग्लॅमरस दिसणा-या शनायाच्या प्रेमात पडलेल्या गॅरीला पाहून राधिकाही आपला मार्ग बदलत अशा परिस्थितीत खंबीर बनत आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.गुरूनाथ आणि संजनाची लव्हस्टोरी सुरू झाली तर शनाया काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
SEE PICS:
'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेने पूर्ण केले 400 एपिसोड्स,सेलिब्रेशनवेळी कलाकारांचा असा होता अंदाजया मालिकेने त्यांचे 400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात एन्जॉय केली आहे. त्यामुळे 400 एपिसोड्सचा टप्पा पार केलेल्या या मालिकेचे 1000 एपिसोडस होवोत अशाच सा-यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.सुंदर आणि ग्लॅमरस दिसणारी संजना प्रोफेशनल मॉडेल आहे.