​‘का रे दुरावा’ युनिटच्या डोळ्यात गंगा-जमूना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 19:19 IST2016-03-27T02:19:56+5:302016-03-26T19:19:56+5:30

‘का रे दुरावा’ मालिकेचा शेवटचा सीन संपला आणि आता आपण पून्हा भेटणार नाही अशी जाणिव होताच प्रत्येकाच्या डोळ्यात गंगा-जमूना ...

Ganga-Jamuna in the eyes of 'Kai Drava' unit | ​‘का रे दुरावा’ युनिटच्या डोळ्यात गंगा-जमूना

​‘का रे दुरावा’ युनिटच्या डोळ्यात गंगा-जमूना

ा रे दुरावा’ मालिकेचा शेवटचा सीन संपला आणि आता आपण पून्हा भेटणार नाही अशी जाणिव होताच प्रत्येकाच्या डोळ्यात गंगा-जमूना वाहू लागल्या. 

संपूर्ण दिवस चित्रीकरण करताना सतत डोक्यात ह्या विरहाची जाणिव होतीच. पण शेवटच्या सीननंतर ही जाणिव जास्तच उफाळून आली. एकमेकांच्या नजरा भिडल्या आणि मग सर्वांचे डोळे ओले झाले. 

मालिकेची निर्मिती नमिता सेटवर आली आणि तिने सर्व युनिटचे आभार मानले. आणि सुरूची आदारकर रडू लागली. तिच्या पाठोपाठ सुयश टिळक, नेहा जोशी, अर्चना निपणकर यांनीही रडायला सुरुवात केली. विशाखा सुभेदार, सुनील तावडे, नेहा कुलकर्णी ह्यांचेही अश्रु अनावर झाले. एकमेकांना मिठी मारुन सगळ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

Web Title: Ganga-Jamuna in the eyes of 'Kai Drava' unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.