जेमिनी हाऊस स्टुडीओत भूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 14:17 IST2016-04-19T08:47:40+5:302016-04-19T14:17:40+5:30
एमआयडीसी अंधेरीतील जेमिनी हाऊस स्टुडिओमध्ये लेक लाडकी माझी या मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. मात्र या मालिकेतील नवे कलाकार एका ...
.jpg)
जेमिनी हाऊस स्टुडीओत भूत
‘लेक लाडकी माझी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका करणारी ऐश्वर्या नारकरने हे मान्य केले आहे. ती म्हणाली, मी टीव्ही कलाकार म्हणून काम करू लागल्यापासून येथे भूत असल्याचे ऐकले आहे. मात्र हे भूत निरुपद्रवी असून त्याचा व्यवहार मैत्रीपूर्ण आहे. टीव्हीवरील दीर्घकाळ काम के लेले कालकार या भूताचा वापर नव्या कलावंतांची थट्टा करण्यासाठी करतात. सध्या या भूताने नक्षत्र व सायली यांना लक्ष्य केले आहे. कारण ते दोघेही या इंडस्ट्रीमध्ये नवे आहेत.
दोघेही या भूताच्या दहशतीखाली असून त्यांना या भूताची चांगलीच भिती वाटयला लागली आहे. आम्ही देखील या भूताच्या गोष्टींचा वापर करून घेतच आहोत असेही ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या नारकर लेक माझी लाडकी या मालिकेत नक्षत्रच्या आईची भूमिका करीत आहे.