पुन्हा जमणार भट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:35 IST2016-06-22T12:05:30+5:302016-06-22T17:35:30+5:30
जे. डी. मजेठियाच्या बा बहू और बेबी या मालिकेत सरिता जोशी, राजीव मेहता, लुब्ना सलीम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या ...

पुन्हा जमणार भट्टी
ज . डी. मजेठियाच्या बा बहू और बेबी या मालिकेत सरिता जोशी, राजीव मेहता, लुब्ना सलीम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेची ही टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिडकी या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच ऐश्वर्या सखुजाही मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. खिडकी या मालिकेत प्रेक्षकांना वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कथा ही आठ-दहा दिवसांची असेल. मालिकेत कथेच्या मागणीनुसार प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे एकाच मालिकेत प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.