"एक वर्ष अधिक शहाणे झाल्याबद्दल...", ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:39 IST2025-11-11T13:38:38+5:302025-11-11T13:39:18+5:30
Rishi Saxena And Isha Keskar : ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाने तिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

"एक वर्ष अधिक शहाणे झाल्याबद्दल...", ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषी सक्सेनाची खास पोस्ट
'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शिवकुमार म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली. २०१६ साली प्रसारित झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेचा शिखर गाठलं होतं. ऋषी आणि अभिनेत्री ईशा केसकर बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. ते अनेकदा एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. दरम्यान आज ईशाच्या वाढदिवसानिमित्त ऋषीने तिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
ऋषी सक्सेनाने इंस्टाग्रामवर ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय स्वप्नाळू, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. एक वर्ष मोठे झाल्याबद्दल आणि आशा आहे की एक वर्ष अधिक शहाणे झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईशा केसकर. त्याच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अशी फुलली ईशा आणि ऋषीची लव्हस्टोरी!
अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. २०१८ मध्ये, ऋषीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. 'चला हवा येऊ द्या' या शोच्या सेटवर ईशा आणि ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ईशा ऋषीच्या शांत स्वभावावर भाळली होती. अर्थात, त्या भेटीत त्यांचे फारसे बोलणे झाले नाही. यानंतर, झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा आणि ऋषी यांच्यात बोलणे सुरू झाले आणि विशेष म्हणजे ईशानेच पुढाकार घेत ऋषीला कॉफीसाठी विचारले. पुढे त्यांची मैत्री अधिक बहरली आणि एक दिवस या मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या गोड कबुलीमध्ये झाले.