Flashback 2025 : काही इच्छा अपूर्ण, तर काही कठीण धडे; 'कमळी' फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णीसाठी कसं होतं २०२५ वर्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:24 IST2025-12-29T17:23:38+5:302025-12-29T17:24:25+5:30

'Kamali' fame actress Ketaki Kulkarni : झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेला प्रेक्षकांची कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अनिकाची भूमिका अभिनेत्री केतकी कुलकर्णीने साकारली आहे. नुकतेच केतकी कुलकर्णी हिने २०२५ हे वर्ष तिच्यासाठी कसे होते, याबद्दल सांगितले.

Flashback 2025 : Some wishes unfulfilled, some hard lessons; How was 2025 for 'Kamali' fame actress Ketaki Kulkarni? | Flashback 2025 : काही इच्छा अपूर्ण, तर काही कठीण धडे; 'कमळी' फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णीसाठी कसं होतं २०२५ वर्ष?

Flashback 2025 : काही इच्छा अपूर्ण, तर काही कठीण धडे; 'कमळी' फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णीसाठी कसं होतं २०२५ वर्ष?

झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेला प्रेक्षकांची कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अनिकाची भूमिका अभिनेत्री केतकी कुलकर्णीने साकारली आहे. नुकतेच केतकी कुलकर्णी हिने २०२५  हे वर्ष तिच्यासाठी कसे होते, याबद्दल सांगितले. 

केतकी कुलकर्णीसाठी २०२५  हे वर्ष तिच्यासाठी खूपच मिश्र अनुभवांचे होते. ती म्हणाली की, ''जानेवारी ते जुलै या काळात मी एक वेगळी व्यक्ती होते आणि जुलै ते डिसेंबरमध्ये मी पूर्णपणे बदलले. सध्या मी जी आहे ती व्यक्ती मला जास्त आवडते. २०२५ मी अनेक शिकवणींसह संपवत आहे .अशा शिकवण्या ज्या मी आयुष्यभर सोबत ठेवणार आहे. ती पुढे सांगते की काही गोष्टींसाठी ती खूप कृतज्ञ आहे, तर काही कठीण धडे आयुष्य कसे जगायचे, प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करायचा, हे शिकवणारे होते. २०२५ ने मला शिकवले की काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात आणि फार जास्त अटॅचमेंट ठेवू नये. देवावर विश्वास ठेवावा आणि सगळं काही एका कारणासाठीच घडतं, हे मान्य करावं. ''

''२०२५ मधला सगळ्यात मोठा धडा हाच आहे...''

ती पुढे म्हणाली, ''माझ्यासाठी २०२५ मधला सगळ्यात मोठा धडा हाच आहे. कुठल्याही गोष्टीसाठी जास्त काळ दुःखी राहण्यापेक्षा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. हा धडा मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.२०२५  मधली तिची सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे कमळी या मालिकेसाठी झी मराठीसोबत काम करणे आणि अनिका ही भूमिका साकारणे. २०२५  मध्ये काही इच्छा पूर्ण न झाल्याचंही ती प्रामाणिकपणे मान्य करते. मला इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स हवेत, ही थोडीशी सिली  इच्छा होती, पण ती अजून पूर्ण झाली नाही. तसंच मला खूप प्रवास करायचा होता, परदेशातही जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. आता आशा आहे की २०२६ मध्ये या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे शिकवल्याबद्दल २०२५ ला धन्यवाद. मला मी कोण आहे हे ओळखायला शिकवलंस. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन गोष्टी मिळवण्याची संधी दिलीस. स्वीकारायला, पुढे जायला, संधी ओळखायला आणि प्रत्येक क्षण जगायला शिकवलंस म्हणून थँक यु. नववर्षाचं सेलिब्रेशन मी  आपल्या जवळच्या लोकांसोबत करणार असून, मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे डांस करत सेलिब्रेट करून वर्षाचा शेवट करणार आहे.''

''२०२५  हे शिकवणीचं वर्ष होतं आणि...''

''२०२५  हे शिकवणीचं वर्ष होतं आणि २०२६  मध्ये त्या शिकवण्या वापरण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रवास करायचा आहे, आरोग्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. किमान बेसिक वर्कआऊट तरी नियमित करणं, सोशल मीडिया अकाउंटवर काम करून जे मागच्या वर्षी राहून गेलं ध्येय  साध्य करायचं आहे. तसंच माझ्या चाहत्यांशी जास्त कनेक्ट होऊन त्यांना काय पाहायला आवडेल  माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर  तेही जाणून घ्यायचं आहे'',असे केतकीने सांगितले. 

Web Title : केतकी कुलकर्णी ने 2025 में सीखी बातों और अधूरी इच्छाओं पर विचार किया।

Web Summary : अभिनेत्री केतकी कुलकर्णी ने बताया कि 2025 मिश्रित अनुभवों का वर्ष था, जिसने उन्हें वैराग्य और कृतज्ञता के बारे में बहुमूल्य जीवन के सबक सिखाए। वह 2026 में यात्रा के सपने पूरे करने और प्रशंसकों से जुड़ने का लक्ष्य बना रही हैं, 2025 की सीखों पर निर्माण कर रही हैं।

Web Title : Ketaki Kulkarni reflects on lessons learned and unfulfilled wishes in 2025.

Web Summary : Actress Ketaki Kulkarni shares 2025 was a year of mixed experiences, teaching her valuable life lessons about detachment and gratitude. She aims to fulfill travel dreams and connect with fans in 2026, building on 2025's learnings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.