‘जमाई राजा’चे पाचशे भागाचे सेलिब्रेशन जरा हटके !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:12 IST2016-06-22T06:42:08+5:302016-06-22T12:12:08+5:30
एखाद्या सिनेमा, मालिकाच्या यशाचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं की जंगी पार्टी होते.या पार्टीला कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळे धम्माल मस्ती करत ...

‘जमाई राजा’चे पाचशे भागाचे सेलिब्रेशन जरा हटके !
पार्टी होते.या पार्टीला कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सगळे धम्माल
मस्ती करत यशाचं दणकेबाज सेलिब्रेशन करतात. मात्र ‘जमाई राजा’ या छोट्या
पडद्यावरील मालिकेच्या पाचशे भागाच्या सेलिब्रेशनची बात थोडी खास होती..
कारण हे सेलिब्रेशन कलाकार, दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसह नव्हते.. तर
हे सेलिब्रेशन होतं पडद्यामागे राहून मालिकेच्या यशात सिंहाचा वाटा
उचलणा-या बॅट स्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ, स्पॉटबॉयज, मेकअपमन
यांच्यासोबत.. जमाई राजा मालिकेत प्रमुख भूमिका साकारणा-या रवी दुबे या
कलाकारानं पडद्यामागे राहून मालिकेच्या यशासाठी झटणा-यांसाठी या खास
सेलिब्रेशन पार्टीचं आयोजन केलं होतं.. मालिकेच्या यशात जेवढं यश
कलाकारांचं आहे त्याहून अधिक या पडद्यामागच्या कलाकारांचं असतं असं रवीला
वाटतं. न थकता, न कोणतंही कारण देतो, कशाचीही तमा न बाळगता ते तासनतास
राबत असतात आणि त्यामुळंच त्यांचा या मालिकेच्या यशात सिंहाचा वाटा
असल्याचं रवीनं सांगितलंय. आगामी काळात अशाप्रकारचे पडद्यामागच्या
कलाकारांसाठी पार्टीचं आयोजन करत राहणार असल्याचा निर्धार त्यानं केलाय.