‘झलक’च्या पहिल्या भागात हा डान्सिंग स्टार असणार पहिला पाहुणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 12:19 IST2016-07-06T06:49:05+5:302016-07-06T12:19:05+5:30
डान्स रियालिटी शो झलक दिखला जा-9 जुलै महिन्याच्या अखेरीस छोट्या पडद्यावर दाखल होतोय.. या शोच्या पहिल्या भागात प्रमुख पाहुणा ...

‘झलक’च्या पहिल्या भागात हा डान्सिंग स्टार असणार पहिला पाहुणा !
ड न्स रियालिटी शो झलक दिखला जा-9 जुलै महिन्याच्या अखेरीस छोट्या पडद्यावर दाखल होतोय.. या शोच्या पहिल्या भागात प्रमुख पाहुणा असेल तो अभिनेता हृतिक रोशन.... आगामी 'मोहन्जेंदडो' या सिनेमाच्या प्रमोशनला हृतिक या शोमधून सुरुवात करणार आहे.. मोहन्जेंदडो हा सिनेमा 12 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येतोय. त्यामुळं आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनला हृतिक झलकच्या सेटवर जाऊन डान्सर आणि सेलिब्रिटी जजसह करणार आहे.. जुलैच्या दुस-या तिस-या आठवड्यात मुंबईतील फिल्मसिटीमध्ये झलकच्या या भागाचं शुटिंग होणार आहे.. 2013 साली बँग बँग या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतिकनं झलकच्या फिनालेला हजेरी लावली होती.. त्यावेळी सेलिब्रिटी जज धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेनेसह हृतिक थिरकला होता.. त्यामुळं आता पुन्हा एकदा डान्स फ्लोर गाजवण्यासाठी हृतिक सज्ज झालाय..