महेश्वरमध्ये ‘काळभैरव रहस्य’च्या कलाकारांनी केले 20 दिवस चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:21 IST2017-11-02T10:51:10+5:302017-11-02T16:21:10+5:30

आजवर कधी न सादर झालेली रहस्यमय कथा‘काळभैरव रहस्य’ या सनसनाटी मालिकेतून सिध्दपूर या काल्पनिक गावातील एका पुरातन मंदिराभोवती असलेल्या ...

Filmmaking by Maheshwar's 'Kalbhairav ​​Mystery' artist shot for 20 days | महेश्वरमध्ये ‘काळभैरव रहस्य’च्या कलाकारांनी केले 20 दिवस चित्रीकरण

महेश्वरमध्ये ‘काळभैरव रहस्य’च्या कलाकारांनी केले 20 दिवस चित्रीकरण

वर कधी न सादर झालेली रहस्यमय कथा‘काळभैरव रहस्य’ या सनसनाटी मालिकेतून सिध्दपूर या काल्पनिक गावातील एका पुरातन मंदिराभोवती असलेल्या रहस्याची कथा उत्कंठावर्धक पध्दतीने प्रेक्षकांपुढे सादर होत असून तिला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेच्या कलाकारांनी अलीकडेच इंदूरपासून सुमारे 20 किमी अंतरावरील महेश्वर येथे 20 दिवस मालिकेचे चित्रीकरण केले. महेश्वरला तुलनेने उष्ण हवामान असूनही या कलाकारांनी तेथे दिवसभर चित्रीकरण केले. या चित्रीकरणासंदर्भात प्रमुख कलाकार राहुल शर्मा म्हणाला, “आम्ही महेश्वरमध्ये तब्बल 20 दिवस चित्रीकरण केलं होतं.आम्हा सर्वांसाठी हा एक चांगला अनुभव होता. तिथल्या सुंदर स्थळांवर चित्रीकरण करण्याबरोबरच आम्हाला मालिकेतील सर्व कलाकार आणि कर्मचार्‍्यांशी संवाद साधता आला.”राहुलने सांगितले, “महेशवरमध्ये तेव्हा फारच उकाडा होता आणि भर उन्हात चित्रीकरण करणं कधी कधी खूप त्रासाचं होत होतं. तरीही आम्ही तिथे उत्तम चित्रीकरण केलं.”आपली भूमिका अधिकाधिक वास्तववादी करण्यासाठी आजकाल बहुतेक कलाकार आपल्या भूमिकेला सर्वस्व देऊ लागले असून त्याचे प्रतिबिंब या मालिकेत पडलेले दिसेल, अशी आशा आहे.मालिकेत राहुल शर्मा राहुलची, छावी पांडे नम्रताची, शगुन कौर गौरीची, इक्बाल खान इंद्राची, माधवी गोगटे कलावतीची, सोमेश अगरवाल वैद्याची आणि श्याम मशालकर मनोजची भूमिका साकारत आहे.

अभिनेता  इक्बाल खान हा ‘कालभैरव- रहस्य’ या आगामी मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत तो इंद्रदेवाची भूमिका साकारणार असून या छोटेखानी परंतु महत्त्वाच्या भूमिकेत तो आपल्या दर्जेदार अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.या मालिकेत तो एका पाहुण्या कलाकाराची भूमिकेत झळकणार आहे. याविषयी इक्बालने सांगितले की, “या मालिकेचा दिग्दर्शक धर्मेश शहा हा माझा जवळचा मित्र असून माझ्या मते तो या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. मी त्याला नकार देऊ शकत नसल्याने मी ही भूमिका स्वीकारली. माझी जरी एका पाहुण्या कलाकाराची भूमिका असली, तरी या मालिकेचं कथानक इतकं गुंतागुंतीचं आहे की पहिल्या दृष्यापासून प्रेक्षक तिला खिळून राहतील.” तो पुढे म्हणाला, “अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबर चित्रीकरण करताना मला मजा आली. मालिकेच्या प्रारंभीच्या काही भागांचं चित्रीकरण आम्ही महेश्वर येथील शंकराच्या सुमारे 400 वर्षं जुन्या मंदिरात केलं. तिथलं वातावरण फारच अद्भुत होतं. यापूर्वी मी छायाचित्रणप्रमुख वीरू आणि धर्मेश यांच्याबरोबर काम केलं असून यावेळचा अनुभवही तितकाच उत्तम होता. या मालिकेच्या सार्‍या टीमला माझ्या शुभेच्छा.भावनात्मक आणि भव्यतेबाबत धर्मेश शहा सहसा चुकीचा ठरत नाही, याची मला खात्री आहे.”त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेन असा विश्वास असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Filmmaking by Maheshwar's 'Kalbhairav ​​Mystery' artist shot for 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.