वडिल मुलाच्या नात्याचा हळवा बंध उलगडणारा वेल डन भाल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:42 IST2016-03-09T04:42:57+5:302016-03-08T21:42:57+5:30
आई व मुलांच्या नात्यावर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी वडिल व मुलांच्या नात्यावर फारसे चित्रपट ...
.jpg)
वडिल मुलाच्या नात्याचा हळवा बंध उलगडणारा वेल डन भाल्या
आई व मुलांच्या नात्यावर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी वडिल व मुलांच्या नात्यावर फारसे चित्रपट पहायला मिळत नाहीत. १८ मार्चला प्रदर्शित होणा?्या वेल डन भाल्या या चित्रपटातूनवडील आणि मुलाच्या नात्याची अनोखी कहाणी पहायला मिळणार आहे. खरं तर वडिल आणि मूल यांच्यामध्ये एक अव्यक्त अतूट बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो. वेल डन भाल्या या चित्रपटातही वडिल आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात याचा संवेदनशील प्रवास पडद्यावर पहायला मिळणार आहे.
अचिंत्य फिल्म्स व सिद्धी आराध्या फिल्म्स प्रस्तुत वेल डन भाल्या या सिनेमात संजय नार्वेकर यांनी वडिलांची तर बालकलाकार नंदकुमार सोलकर यांनी मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलाने शिकून मोठं व्हाव अशी वडिलांची अपेक्षा असते. तो शिकेल का, त्याचे क्रिकेट प्रेम त्याला कुठे घेऊन जाईल? त्याच्या वडिलांवर त्याच्या खेळाचा काय परिणाम होईल? याची कथा वेल डन भाल्या मध्ये पहायला मिळणार आहे.
नितीन कांबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चैताली आणि अमोल काळे यांनी निर्मिती केली असून सह-निमार्ते सुनील महाजन आहेत. नितीन सुपेकर यांनी कथा लिहिली आहे पटकथा संवाद नितीन सुपेकर व नितीन कांबळे यांचे आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण आय गिरिधरन, शानू सिंह रजपूत, यांचे असून संकलन प्रवीण कुमार, समीर शेख, राहुल भातणकर यांचं आहे. कलादिग्दर्शनाची महेंद्र राऊत तर रंगभूषेची जबाबदारी लक्ष्मण जाधव यांनी सांभाळली आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन संजय कांबळे याचं आहे. मार्केटिंग हेड संजय (बापू) व शितल पावस्कर हे आहेत.
या चित्रपटात रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे, संजय खापरे, अंशुमाला पाटील राजेश कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता जाधव, गॅरी टँटनी बालकलाकार नंदकुमार सोलकर, सौरभ करवंदे अशी कलाकार मंडळी आहेत.