​लिप सिंग बॅटलमध्ये फरहान अख्तर दिसला ऋषी कपूर यांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 09:12 IST2017-09-09T03:42:31+5:302017-09-09T09:12:31+5:30

स्टार प्लस वाहिनीवर लिप सिंग बॅटल हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. हा कार्यक्रम लिप सिंक बॅटल या आंतरराष्ट्रीय ...

Farhan Akhtar plays Rishi Kapoor in Lip Sing Battles | ​लिप सिंग बॅटलमध्ये फरहान अख्तर दिसला ऋषी कपूर यांच्या भूमिकेत

​लिप सिंग बॅटलमध्ये फरहान अख्तर दिसला ऋषी कपूर यांच्या भूमिकेत

टार प्लस वाहिनीवर लिप सिंग बॅटल हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. हा कार्यक्रम लिप सिंक बॅटल या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर आधारित आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमाविषयी सर्वसामान्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे.
कोरिओग्राफर, दिग्दर्शक फराह खान लिप सिंग बॅटल या़ कार्यक्रमाची सर्वेसर्वा असून या कार्यक्रमात तिला अली असगरची साथ मिळाली आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी या रिॲलिटी शोमध्ये आपल्याला दिसणार आहेत. हे सेलिब्रिटी या कार्यक्रमात त्यांचे परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या भागात फरहान अख्तरने उपस्थिती लावली होती. फरहान आज बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने या कार्यक्रमात ऋषी कपूर यांचे सर्वांत आयकॉनिक गाणे ओम शांति ओमवर परफॉर्मन्स सादर केला. फरहानने यासाठी कॉस्च्युमदेखील अगदी ऋषी कपूर यांच्या सारखाच घातला होता. त्यामुळे तो पूर्णपणे त्या व्यक्तिरेखेत शिरला होता. फरहान हा डान्स परफॉर्म करण्यासाठी खूपच उत्सुक होता. या गाण्यासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतली असल्याचे म्हटले जात आहे. फरहानला लहानपणापासूनच ऋषी कपूर यांचे या चित्रपटातील ओम शांति ओम हे गीत खूप आवडते. त्यामुळेच त्याने या गाण्यावर नृत्य करण्याचे ठरवले. हे गाणे फरहानने ऋषी कपूर यांना समर्पित केले.
लिप सिंग बॅटलच्या स्टेजवर फरहानने ओम शांति ओमवर खूपच चांगला परफॉर्मन्स सादर केला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तर त्याचा परफॉर्मन्स अक्षरशः डोक्यावर घेतला होता. प्रेक्षकांना लवकरच या कार्यक्रमात फरहाननचा परफॉर्मन्स पाहाता येणार आहे.  

Also Read : ​​कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये फरहान अख्तरला काम

Web Title: Farhan Akhtar plays Rishi Kapoor in Lip Sing Battles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.