n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">फराह खान सध्या झलक दिखला जा या मालिकेत परीक्षकाची भूमिका साकारत आहे. तिने याआधीही छोट्या पडद्यावर परीक्षक म्हणून काम केले आहे. छोटा पडदा हा गेल्या कित्येक वर्षांत बदलला आहे असे तिचे म्हणणे आहे. फरहाला मालिकांपेक्षा रिअॅलिटी शो पाहाणे अधिक आवडते असे ती सांगते. तसेच चित्रपट दिग्दर्शित करणे हे मालिका दिग्दर्शित करण्यापेक्षा सोपे आहे असे तिचे मत आहे. मालिका दिग्दर्शित करायची असल्यास दिवसातील कित्येक तास द्यावे लागतात. माझी मुले लहान असल्यामुळे मालिका दिग्दर्शित करण्याचा काहीही विचार नाही असे ती सांगते.