यार प्लीज असं करु नका.. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संपणार म्हणून चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:11 PM2022-09-02T16:11:53+5:302022-09-02T16:44:30+5:30

छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. एक लोकप्रिया मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हणून ही एकच चांगली मालिका सुरु आहे त्यामुळे ती बंद नको नका अशी विनंती केली जातेय.

Fans are upset as the popular serial on Zee Marathi is going off air | यार प्लीज असं करु नका.. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संपणार म्हणून चाहत्यांना बसला धक्का

यार प्लीज असं करु नका.. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका संपणार म्हणून चाहत्यांना बसला धक्का

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हा प्रेक्षक मायबाप मालिकांवर प्रचंड प्रेम करतो. पण प्रसंगी संतापतो देखील.  मालिकांमध्ये तेच ते कथानक, मनाला न पटणारी दृश्य, अतिशयोक्ती दाखवली की प्रेक्षक नाराज होतात. पण सध्या झी मराठी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हणून चाहते नाराज झालेत. सोशल मीडियावर त्यांनी ही मालिका बंद करु नका अशी थेट विनंती केलीय. 

गेल्या काही महिन्यात झी मराठी (Zee Marathi)या वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. अर्थात टीआरपीच्या रेसमध्ये टिकायचं तर हे गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर अशा नव्या मालिका सुरू झाल्या. लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आणि‘दार उघड बये’ (Dar Ughad Baye) या मालिका सुरु होणार आहेत. नवी मालिका सुरु होणार म्हणजेच अर्थातच जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

माझी तुझी रेशीमगाठ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या जागी आता ‘दार उघड बये’ ही मालिका सुरु होणार आहे.  माझी तुझी रेशीमगाठ’ही मालिका येत्या १७ सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणारे. हे ऐकून या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसलाय. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, यार प्लीज अस करु नका, प्लीज ऑफ एअर नका करू मस्त आहे सिरीयल प्लीज चालू द्या बंद नका करु अशी विनंती प्रेक्षक करतायेत. 

Web Title: Fans are upset as the popular serial on Zee Marathi is going off air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.