'देवा शप्पथ' मालिकेत श्रद्धा,अंधश्रद्धा आणि नास्तिकतेचा संघर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 08:39 AM2018-01-04T08:39:21+5:302018-01-04T14:09:21+5:30

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं.विविध प्रकार,वेगवेगळे आशय आणि विषय असलेल्या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.कौटुंबिक,कॉमेडी अशा ...

Faith, superstitions and atheism struggle in 'God Shapath' series! | 'देवा शप्पथ' मालिकेत श्रद्धा,अंधश्रद्धा आणि नास्तिकतेचा संघर्ष!

'देवा शप्पथ' मालिकेत श्रद्धा,अंधश्रद्धा आणि नास्तिकतेचा संघर्ष!

googlenewsNext
ट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं.विविध प्रकार,वेगवेगळे आशय आणि विषय असलेल्या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.कौटुंबिक,कॉमेडी अशा मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.अशाच विविधरंगी मालिकांमध्ये आणखी एका मालिकेची भर पडली आहे.'देवा शप्पथ' नावाची ही मालिका सध्या वेगळी ठरत आहे.देव,देवाचं अस्तित्व, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर भाष्य करणारी ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल या भन्नाट फँटसीवर ही मालिका बेतली आहे.आस्तिक आणि नास्तिक अशा दोन टोकांच्या विचारांचा मेळ घालण्यासाठी आणि मैत्रीचा संदेश देण्याकरिता क्रिश मानवाच्या रुपात आला आहे.मानवी रुप धारण केल्यामुळे त्याला माणसाप्रमाणेच भोग भोगावे लागत आहेत असं कथानक या मालिकेत पाहायला मिळतं.क्रिश आणि श्लोक या दोन व्यक्तीरेखांभोवती ही मालिका फिरते.या मालिकेत आता एक नवा ट्विस्ट येणार आहे. याशिवाय लक्ष्मीदेवीसुद्धा या मालिकेत अवतरणार आहेत.तसंच मोठा भक्तसंप्रदाय असणारे चैतन्य स्वामी हे स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणवतात.ते त्यांच्या भक्तांना चमत्कार करून भारावून टाकतात,कधी त्यांच्या मठात कृष्णलीला रचतात तर कधी कुठे देवाच्या देवळात जाऊन दर्शन घेता म्हणून त्या देवाचं दर्शन त्यांच्या आश्रमातच घडवतात.चैतन्य स्वामींना श्लोकच्या चॅटवेलची मदत घेऊन आणखी मोठा ब्रॅण्ड बनायचं आहे.मात्र श्लोकचा त्यांना विरोधआहे.श्लोक आणि चैतन्य स्वामींमधला संघर्ष येत्या काळात पराकोटीला जाणार आहे.चैतन्य स्वामी विषयी खुद्द देवाचं म्हणजे क्रिशचं काय भाष्य असेल. त्यामुळे या मालिकेत श्रध्दा,अंधश्रध्दा आणि नास्तिकता यांचा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.यानिमित्ताने रसिकांचंही मात्र मनोरंजन होणार आहे.अभिनेता वैभव मांगले अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वामी चैतन्य या भूमिकेत दिसणार आहे.आजपर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत,पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवतील. आजच्या युगातील हाच विचार या मालिकेत मांडण्यात आला आहे.विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे,शाल्मली टोळ्ये,अभिषेक कुलकर्णी , कौमुदी वालोकर  चैत्राली गुप्ते,आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत 

Web Title: Faith, superstitions and atheism struggle in 'God Shapath' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.