​एक दुजे के वास्ते फेम निकिता दत्ताला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:07 IST2017-04-28T05:37:18+5:302017-04-28T11:07:18+5:30

निकिता दत्ताने काही महिन्यांपू्र्वी एक दुजे के वास्ते या मालिकेत काम केले होते. या मालिकेला सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांची चांगली ...

Failure of a knee injury to Fame Nikita Datta | ​एक दुजे के वास्ते फेम निकिता दत्ताला झाली दुखापत

​एक दुजे के वास्ते फेम निकिता दत्ताला झाली दुखापत

किता दत्ताने काही महिन्यांपू्र्वी एक दुजे के वास्ते या मालिकेत काम केले होते. या मालिकेला सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. पण नंतरच्या काळात या मालिकेचा टीआरपी ढासळत गेला. या मालिकेत निकिता दत्ता आणि नमिक पॉल प्रमुख भूमिका साकारत होते. पण ते दोघेही अचानक आजारी पडल्याने या मालिकेचे चित्रीकरण करू शकत नव्हते. निकिताला ताप असल्याने तिला काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यानंतरही तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे तिच्यासाठी चित्रीकरण करणे अशक्य होते तर दुसरीकडे नमिक पॉललादेखील सतत ताप येत असल्याने त्यालादेखील आरामाची गरज होती. निकिता आणि नमिक चित्रीकरणाला उपलब्ध नसल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडत होती आणि याच कारणांमुळे ही मालिका संपवण्याचा निर्णय वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतला होता. या मालिकेने 7 ऑक्टोबरला एका गोड वळणावर प्रेक्षकांचा निरोप घेतला.
या मालिकेतली निकिता आणि नमिक यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. प्रेक्षकांच्या लाडक्या निकिताला आता दुखापत झाली असून तिच्या पायाला बँडेजदेखील करण्यात आलेले आहे. तिने ट्विटर या सोशल नेटवर्किंगवर दुखापत झालेल्या पायाचा फोटो टाकला असून सेल्फ डिफेन्स क्लासेसचा पहिलाच दिवस असे कॅप्शन लिहिले आहे. याविषयी निकिता सांगते, मी गेल्या काही दिवसांपासून जिमला जात होते. तसेच योगादेखील करत होते. पण माझे वजन काही केल्या कमी होत नव्हते. त्यामुळे माझ्या कोचने मला किकबॉक्सिंगचे क्लासेस लावायला सांगितले. क्लासचा माझा पहिलाच दिवस होता आणि पहिल्या दिवशी किक कशी मारायची हे मी शिकत होते. पण मी पंचिग बॅगवर जोरात किक मारल्यानंतर चुकून माझा पाय माझ्या कोचच्या ढोपरांना लागला. खरे तर त्यावेळी मला दुखापत झाल्याचे लक्षातच आले नाही. त्यामुळे मी पुन्हा किक मारतच होते. पण काहीच वेळात माझा पाय सुजला. एवढे होऊनही माझ्या पायाला जास्त काही झाले नाही यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी 3-4 दिवसात बरी होईल असे डॉक्टरांनी मला सांगितले आहे. 

Web Title: Failure of a knee injury to Fame Nikita Datta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.