n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमातील सगळे कलाकार या कार्यक्रमातून बाहेर पडले आणि त्यांनी द कपिल शर्मा शो हा नवा कार्यक्रम सुरू केला. केवळ या कार्यक्रमात बुवाची व्यक्तिरेखा साकारणारी उपासना सिंग हिचा वाहिनीसोबत करार असल्याने ती ही मालिका सोडू शकणार नाही असे म्हटले जात होते. पण उपासना सिंगनेही आता या मालिकेला रामराम ठोकला आहे. कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस ढासळत आहे. तसेच आता मिका आणि उपासना या दोघांनीही हा कार्यक्रम सोडला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम बंद होणार असल्याचीही सध्या चर्चा आहे.