Exclusive : ​वैभव मांगले दिसणार या हिंदी मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:14 IST2017-09-09T06:44:43+5:302017-09-09T12:14:43+5:30

वैभव मांगलेने फू बाई फू या कार्यक्रमात एकापेक्षा एक अफलातून परफॉर्मन्स सादर केले होते. त्याची शेजारी शेजारी पक्के शेजारी ...

Exclusive: Vaibhav will appear in Hindi or in the Hindi series | Exclusive : ​वैभव मांगले दिसणार या हिंदी मालिकेत

Exclusive : ​वैभव मांगले दिसणार या हिंदी मालिकेत

भव मांगलेने फू बाई फू या कार्यक्रमात एकापेक्षा एक अफलातून परफॉर्मन्स सादर केले होते. त्याची शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. त्याने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावर देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, काकस्पर्श, शिक्षणाचा आयचा घो, फक्त लढ म्हणा यांसारख्या चित्रपटात त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. टाइमपास या चित्रपटात तर त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील त्याचे सगळे संवाद प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर वैभव मांगले आता हिंदी मालिकेकडे वळला आहे. एका हिंदी मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याची ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
साईबाबांना आपल्या देशात प्रचंड मानले जाते. लोक शिर्डीला तर आवर्जून जातात. साईबाबांच्याच आयुष्यावर आधारित एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचे नाव मेरा साई असे असून ही मालिका सोनी वाहिनीवर सुरू होणार आहे. साईबाबांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत त्यांच्यासोबत असलेल्या अनेक व्यक्तींचा उल्लेख करण्यात येणार आहे. कुलकर्णी यांनी साईबाबांच्या दैवत्वावर नेहमीच संशय घेतला. याच कुलकर्णीची व्यक्तिरेखा वैभव मांगले साकारणार आहे. 
वैभवची ही व्यक्तिरेखा काहीशी नकारात्मक असून वैभवने या मालिकेसाठी चित्रीकरण करायला देखील सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना नेहमी खळखळून हसवणारा वैभव मांगले प्रेक्षकांना मेरा साई या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Exclusive: Vaibhav will appear in Hindi or in the Hindi series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.