​Exclusive : सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचे नच बलियेमधली आव्हान संपुष्टात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 11:41 AM2017-06-07T11:41:03+5:302017-06-07T17:54:40+5:30

प्राजक्ता चिटणीस  सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचे नच बलिये मधील आव्हान संपुष्टात आले आहे. नच बलिये सीझन 8 मधून सिद्धार्थ ...

Exclusive: Siddharth Jadhav and Trupti Nach Baliyan challenge ended! | ​Exclusive : सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचे नच बलियेमधली आव्हान संपुष्टात!

​Exclusive : सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचे नच बलियेमधली आव्हान संपुष्टात!

googlenewsNext
ong>प्राजक्ता चिटणीस 

सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचे नच बलिये मधील आव्हान संपुष्टात आले आहे. नच बलिये सीझन 8 मधून सिद्धार्थ आणि तृप्ती आऊट झाले आहेत. वाइल्ड कार्ड एंट्रीद्वारे सिद्धार्थ आणि तृप्तीला नच मध्ये एंट्री मिळाली होती. सिद्धार्थ आणि तृप्तीच्या जोडीला पहिल्या वेळेस  मत कमी पडल्याने कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी त्यांच्या फॅन्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.  सिद्धार्थ आणि तृप्तीची लोकप्रियता पाहाता त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच तृप्तीसह नृत्यकौशल्य दाखवण्यासाठी सिद्धार्थ उत्साही होता. याआधी दोन मराठी जोड्यांनी नचच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. नच चे पहिले पर्व सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या जोडीने जिंकले होते तर गेल्या वर्षीचे पर्व अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राने आपल्या नावे केले होते. त्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्ती नचचे 8वे पर्व आपल्या नावावरुन करुन विजयाची हॅटट्रिक साधतील अशा आशा व्यक्त करण्यात येत होती. पण सिद्धार्थ आणि तृप्ती आऊट झाल्यामुळे हे स्वप्न आता भांगले आहे. आजपर्यंत सिद्धार्थला अनेक भूमिका साकारताना आपण पाहिलेच आहे मात्र पत्नी तृप्तीची पडद्यावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पडद्याच्या कायम मागे राहिलेले तृप्ती पहिल्यांदा नच बलियेच्या माध्यमातून पडद्यावर झळकली. तृप्ती आणि सिद्धार्थ नचमध्ये आतापर्यंत एक पेक्षा एका सरस परफॉर्मन्स सादर केले आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस पडत होती. सिद्धार्थ आणि तृप्ती आऊट झाल्यामुळे त्यांचे फॅन्स नक्कीच नाराज असतील यात काही शंका नाही.   

Web Title: Exclusive: Siddharth Jadhav and Trupti Nach Baliyan challenge ended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.