Exclusive : ​सख्या रे घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 17:39 IST2017-05-19T12:09:47+5:302017-05-19T17:39:47+5:30

सख्या रे या मालिकेत सुयश टिळक आणि रुची सवर्ण आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. सुयश टिळकने काही महिन्यांपूर्वी ...

Exclusive: Message sums up the audience | Exclusive : ​सख्या रे घेणार प्रेक्षकांचा निरोप

Exclusive : ​सख्या रे घेणार प्रेक्षकांचा निरोप

्या रे या मालिकेत सुयश टिळक आणि रुची सवर्ण आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. सुयश टिळकने काही महिन्यांपूर्वी का रे दुरावा या मालिकेत काम केले होते. त्याची ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्याने या मालिकेत साकारलेली जय ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेनंतर त्याने काही महिने छोट्या पडद्यापासून दूर राहाणे पसंत केले. तो त्यानंतर स्ट्रॉबेरी या नाटकात झळकला. का रे दुरावा या मालिकेत सुरूची अडारकरसोबत त्याची जोडी जमली होती. प्रेक्षकांना हीच जोडी पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी या नाटकात पाहायला मिळाली. सुयशचे हे नाटक चांगलेच गाजले होते. या नाटकानंतर सख्या रे या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
सख्या रे ही मालिका एक रहस्यमय मालिका असून सुयशने या मालिकेत दोन भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत रुची सवर्णसोबत त्याची जोडी जमली होती. रुचीने सखी या मराठी मालिकेत तसेच अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी देखील प्रमुख भूमिकेत होत्या. ही मालिका जानेवारीच्या सुमारास सुरू झाली होती. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
सख्या रे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. ही मालिका सुरू होऊन केवळ काहीच महिने झाले होते. पण टिआरपीच्या रेसमध्ये या मालिकेला टिकता न आल्यामुळे ही मालिका लवकरच बंद होणार आहे. 
सख्या रे या मालिकेची जागा लहानपण देगा देवा ही मालिका घेणार असून या मालिकेत विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच या मालिकेत एक छोटीशी मुलगी त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

Web Title: Exclusive: Message sums up the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.