Exclusive : कमला फेम अश्विनी कासार झळकणार अशी ही बनवाबनवी या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 16:19 IST2017-07-05T05:07:48+5:302017-07-05T16:19:48+5:30
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नव्वदीच्या दशकात प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सिद्धांत ...

Exclusive : कमला फेम अश्विनी कासार झळकणार अशी ही बनवाबनवी या मालिकेत
अ ी ही बनवाबनवी हा चित्रपट नव्वदीच्या दशकात प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सिद्धांत रे, सुप्रिया पिळगांवकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, विजू खोटे आणि सुधीर जोशी यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटाच्या नावाची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अशी ही बनवाबनवी ही मालिका काहीच दिवसांत कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरची एक अभिनेत्री कमबॅक करणार आहे. विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेली कमला ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत कमला ही भूमिका अश्विनी कासारने साकारली होती. अश्विनीची ही पहिलीच मालिका असली तरी प्रेक्षकांनी या मालिकेतील तिची भूमिका डोक्यावर घेतली होती. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी प्रेक्षक तिला कमला म्हणूनच ओळखतात. हीच प्रेक्षकांची लाडकी अश्विनी कासार छोट्या पडद्यावर परतत आहे.
कमला ही मालिका संपल्यानंतर अश्विनी छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. दरम्यानच्या काळात तिने काही नाटकांमध्ये काम केले होते. पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. अशी ही बनवाबनवी या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कमला या मालिकेत प्रेक्षकांना तिला नेहमी साड्यांमध्येच पाहायला मिळाले होते. पण अशी ही बनवाबनवी या मालिकेतील तिचा लूक हा कमला या मालिकेतील तिच्या लूकपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या नव्या भूमिकेसाठी अश्विनी खूपच उत्सुक असल्याचे कळतेय.