Exclusive : ​संतोष जुवेकर घेणार अस्सं सासर सुरेख बाईमधून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 14:19 IST2017-06-12T07:29:43+5:302017-06-12T14:19:32+5:30

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला एक चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेतील यश-जुई यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड ...

Exclusive: Exit from Aston Sassour Sundar Ba, Santosh Juvekar will take over | Exclusive : ​संतोष जुवेकर घेणार अस्सं सासर सुरेख बाईमधून एक्झिट

Exclusive : ​संतोष जुवेकर घेणार अस्सं सासर सुरेख बाईमधून एक्झिट

्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला एक चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेतील यश-जुई यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. तसेच त्यांची जोडी देखील प्रेक्षकांची प्रचंड लाडकी जोडी आहे. पण प्रेक्षकांची एक लाडकी व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत संतोष जुवेकर यश ही भूमिका साकारत आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेत त्याचा अपघात झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. अपघात झाल्यापासून यश रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पण आता या मालिकेत यशचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे.
या मालिकेत संतोष जुवेकर यश ही भूमिका साकारत आहे. संतोष जुवेकरच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. पण संतोष आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत यशची पत्नी जुई गरोदर असल्याचे मालिकेत काहीच दिवसांपूर्वी दाखवण्यात आले होते. जुईच्या या गोड बातमीमुळे घरातील सगळेच प्रचंड खूश होते. पण आता या आनंदात विरजण पडणार आहे. यशच्या मृत्यूची बातमी आल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आता यातून जुई स्वतःला कशाप्रकारे सांभाळते. या दुःखात ती तिच्या घरातल्यांना कशाप्रकारे आधार देते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जुई ही गरोदर असल्याने तिच्या आयुष्यात आलेल्या या वादळातून ती कशाला सावरते. याचा तिच्या बाळावर काही परिणाम होतो का हे सगळे पाहाणे आता रंजक ठरणार आहे. या मालिकेत जुईची व्यक्तिरेखा मृणाल दुसानिस साकारत आहे. 

Web Title: Exclusive: Exit from Aston Sassour Sundar Ba, Santosh Juvekar will take over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.