Exclusive Bigg Boss 12 : इव्हेंटच्या ठिकाणी सलमानने घेतली आपल्या हटके अंदाजात एंट्री, समोर आला पहिला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:17 IST2018-09-04T15:08:18+5:302018-09-04T15:17:26+5:30
सलमान खान पुढच्या काही मिनिटात धमाकेदार शो बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये कोण-कोण सहभागी होणार याची जोरदार चर्चा आहे.

Exclusive Bigg Boss 12 : इव्हेंटच्या ठिकाणी सलमानने घेतली आपल्या हटके अंदाजात एंट्री, समोर आला पहिला फोटो!
श्वेता पांडये
सलमान खान पुढच्या काही मिनिटात धमाकेदार शो बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये कोण-कोण सहभागी होणार याची जोरदार चर्चा आहे. निर्मात्यांना यावेळी काहीतर वेगळे नियम आणि नव्या फॉर्मेटमध्ये आणण्याचा विचार आहे.
यावेळी बिग बॉसचे ग्रँड लाँचिंग सलमान खान गोव्यात करतोय. काही वेळा पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली आहे. सलमानने यावेळी शोच्या ठिकाणी पाण्यातून एंट्री घेतली आहे. सलमानने एंट्री घेताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एक वेगळी एनर्जी त्याच्यात पाहायला मिळाली. यानंतर सलमानने आपल्याच एका 'बेबी को बेस पसंद है' या धमाकेदार गाण्यावर डान्स परफॉर्मेन्स दिला. सलमानचा हा बिग बॉसचे होस्ट म्हणून नववा शो आहे. यावेळी सलमान इथे अनेक खुलासे करणार आहे. कलर्सचे सीईओ राज नायक या इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचले आहेत. थोड्याच वेळाता यात सहभागी होणाऱ्या जोड्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या १२ व्या सिझनची जोरदार तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.
बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.