Ex-Bigg Boss कंटेस्टंट शिल्पा शिंदेला मिळाली कपिल शर्माच्या मित्राची साथ,या शोमध्ये करणार कॉमेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:56 IST2018-04-04T07:26:09+5:302018-04-04T12:56:09+5:30

'बिग बॉस सिझन 11'ची विजेती ठरल्यानंतर शिल्पा शिंदे आता कोणत्या शोमध्ये झळकणार याचीच सा-यांना उत्सुकता होती. त्यामुळे आता शिल्पाच्या ...

Ex-Bigg Boss Contestant Shinde meets Kapil Sharma's friend, comedy in this show | Ex-Bigg Boss कंटेस्टंट शिल्पा शिंदेला मिळाली कपिल शर्माच्या मित्राची साथ,या शोमध्ये करणार कॉमेडी

Ex-Bigg Boss कंटेस्टंट शिल्पा शिंदेला मिळाली कपिल शर्माच्या मित्राची साथ,या शोमध्ये करणार कॉमेडी

'
;बिग बॉस सिझन 11'ची विजेती ठरल्यानंतर शिल्पा शिंदे आता कोणत्या शोमध्ये झळकणार याचीच सा-यांना उत्सुकता होती. त्यामुळे आता शिल्पाच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे.शिल्पाने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिच्या नवीन शो विषयी माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे.शेअर केलेल्या फोटोमध्ये कॉमेडीयन सुनिल ग्रोव्हरही दिसत आहे. त्यानुसार शिल्पा आणि सुनिल दोघेही या शोच्या माध्यमातून एकत्र झळकणार असल्याचे समजतंय.या शोमध्येही शिल्पा आणि सुनिल ग्रोव्हर दोघेही हटके लूकमध्ये दिसणार आहेत.डॉ.मशहुर गुलाटी म्हणून सुनिल आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.त्यामुळेच नवीन शोमध्येही सुनिलचा बदलेला अंदाज रसिकांचे लक्ष वेधुन घेणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

कपिल शर्माच्या कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.या कार्यक्रमामुळे कपिल शर्मा छोट्या पडद्यावरचा स्टार बनला होता. बॉलिवूडमधील स्टार देखील त्याच्या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास प्राधान्य देत होते. पण कलर्स वाहिनीसोबत झालेल्या वादानंतर हा कार्यक्रम बंद झाला. त्यानंतर या कार्यक्रमाच्या टीमला सोबत घेऊन कपिल शर्माने सोनी वाहिनीवर द कपिल शर्मा हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर, अली असगर, किकू शारदा असे त्याच्या टीममधील सगळे एका शो साठी सिडनीला गेले असता विमानातून परतताना कपिलने दारुच्या नशेत सुनिल ग्रोव्हरसोबत भांडणं केली. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्यावर हात देखील उगारला असे म्हटले जाते. त्यामुळे सुनिलने द कपिल शर्मा शो ला रामराम ठोकला. त्याच्यासोबत अली असगरने देखील हा कार्यक्रम सोडला. सुनील आणि अलीने कार्यक्रम सोडल्यानंतर या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत गेला आणि त्यात कपिल शर्मा सतत आजारी असल्याने ऐनवेळी या कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द केले जात होते. या सगळ्या कारणांमुळे हा कार्यक्रम काही दिवसांच्या ब्रेक वर गेला. दरम्यानच्या काळात कपिल फिरंगी या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी त्याला खात्री होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे आता कपिल पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे.

Web Title: Ex-Bigg Boss Contestant Shinde meets Kapil Sharma's friend, comedy in this show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.