'प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो', 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेनं व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:40 IST2023-02-16T15:39:32+5:302023-02-16T15:40:52+5:30
अभिनेता अंकुर वाढवे( Ankur Wadhave)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो', 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेनं व्यक्त केली खंत
झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शोमधून सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोमधून अभिनेता अंकुर वाढवे( Ankur Wadhave)ला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अंकुर वाढवे सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतीच सोशल मीडियावरील त्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
अंकुर वाढवे याने पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, आयुष्यात कधीही प्रेयसी भेटली नाही एक भेटली पण इंटरकास्ट म्हणून लग्नासाठी नकार दिला यानंतर मी निर्णय घेतला कधीही लग्न करायचे नाही आणि केले तर फक्त लव्ह मॅरेज कारण माझं असं म्हणणं होतं की अरेंज मॅरेजमध्ये कदाचित मुली आई बाबांच्या दबावाखाली हो म्हणतात आणि लव्ह मॅरेजसाठी मला कोणी स्वीकारणार नाही हेही तेवढंच सत्य कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो त्यात मी बसत नाही म्हणून ठरवले होत लग्न न करणच ठीक आहे.
पुढे त्याने म्हटले की, निकिताच स्थळ आले आणि तिला न बोलता न भेटता हो बोललो पण तिची इच्छा असेल तर त्याच कारणं अस की ती माझ्या मामाची मुलगी तिला काही गोष्टी माहित होत्या माझ्याबद्दल. फायनल होण्या आधी एक कॉल केला तिला माझ्या सवई (सगळ्या) आणि पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंड बदलही स्पष्ट बोललो तरीही ती हो बोलली... आणि मला जशी हवी होती तशीच गर्लफ्रेंड भेटली... मित्र आहेत असतील पण किमान आतापर्यंत तरी मी तुला आणि तू मला कधीच अंधारात ठेवत नाही.. कदाचीत हे लव्ह मॅरेजमध्ये मिळालं नसतं I LOVE YOU FOREVER बायको आयुष्यभर माझी व्हॅलेंटाईन आहेस. आणि हा बेकार फोटो टाकल्याबद्दल सॉरी म्हणणार नाही.