"माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस...", अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:59 AM2023-10-13T11:59:53+5:302023-10-13T12:00:08+5:30

Atul Aagalaavey : 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अभिनेता अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

"Even as a human being, you are just as ambitious...", Atul Agalave shared a special post for Vidya Sawle. | "माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस...", अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी शेअर केली खास पोस्ट

"माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस...", अतुल आगलावेनं विद्या सावलेसाठी शेअर केली खास पोस्ट

कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची (Sindhutai Mazi Mai Goshta Chindhichi)मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अभिनेता अतुल आगलावे (Atul Aagalaavey)नं विद्या सावले(Vidya Sawale)साठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

अतुल आगलावे याने इंस्टाग्रामवर विद्या सावले सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, खरंतर मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मला तुझ्यासोबत काम करायला मिळालं आहे! आतापर्यंत तू बरीच कामं करून सुद्धा तुझं डेडिकेशन अजुनही अगदी पहिल्या वहिल्या कामावेळी असतं तसंच टिकून आहे जे मला खूप प्रभावित करतं! तुझं सतत काही ना काही खोड्या करत राहणं तर इतकं आवडतं मला की जणू काही एखादं लहान मुलच पाहतोय मी. . . तुझा या मालिकेतला एकूण एक सीन तू इतका कमाल केलायस की तुझी दृष्ट काढावी. . . किती समरसून काम करतेस तू!!!

अभिनेत्याने पुढे लिहिले की, कलाकार म्हणून तर तू कमाल आहेसच पण माणूस म्हणून सुद्धा तू तितकीच उमदी आहेस. तू कायम अशीच रहा. . . तुझ्यातलं लहान मुल असंच कायम हसतं-खेळतं-खोड्या करतं राहुदे! ते कधीच मोठं नको होऊ देऊस! आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्यासोबत काम करायची संधी मिळत राहू दे!!. माही माय!! तुले जनम दिनाच्या खूप खूप सुबेच्छा! तुले आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो!! हॅप्पी बर्थ डे विद्या सावले.

Web Title: "Even as a human being, you are just as ambitious...", Atul Agalave shared a special post for Vidya Sawle.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.