घाडगे & सून या मालिकेत होणार छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री, वर्षभराने करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 13:36 IST2018-06-05T08:06:09+5:302018-06-05T13:36:09+5:30
कलर्स मराठीवर सध्या सुरू असलेली घाडगे & सून ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घाडगे ...

घाडगे & सून या मालिकेत होणार छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री, वर्षभराने करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
क र्स मराठीवर सध्या सुरू असलेली घाडगे & सून ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घाडगे & सून मध्ये बऱ्याच घटना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या आहेत. घाडगे सदन मध्ये माई आणि आण्णा यांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस अमृताने खूप धुमधडाक्यात साजरा केला. पण या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांनाच अक्षयची कमतरता भासली. आण्णा यांनी अक्षयला घाडगे सदन मधूनच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले याचा खूप मोठा धक्का घरातल्यांना आणि अक्षयला बसला आहे. अमृता आता घाडगे परिवारामध्ये चांगलीच रुळू लागली आहे. पण दुसरीकडे वसुधाच्या कुरघोडी सुरूच आहेत... मात्र माईची खंबीर साथ लाभल्याने या अडचणीला देखील ती खंबीरपणे तोंड देत आहे. या सगळ्या घटना घडत असताना मालिकेच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज मिळणार आहे. घाडगे & सून या मालिकेत आता एक नवी एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या नुकत्याच सुरू झालेल्या काही प्रोमोजने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण या प्रोमोज मध्ये प्रेक्षकांना काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनयातून अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकलेला ऋषी प्रेक्षकांना या प्रोमोमध्ये एका नव्या अंदाज मध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर अमृता आणि ऋषी एकमेकांना पहिल्यापासूनच ओळखत आहे हे आपल्याला लगेचच कळत आहे.
ऋषी सक्सेनाच्या एन्ट्रीने मालिकेच्या कथानकाला काय कलाटणी मिळणार? अमृत–अक्षयच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना घाडगे & सून या मालिकेच्या आगामी भागांमध्येच मिळणार आहेत.
“घाडगे & सून” ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता नुकताच २०० भागांचा पल्ला देखील गाठला आहे. या मालिकेत भाग्यश्री लिमये अमृताची तर चिन्मय उद्गिरकर अक्षयची भूमिका साकारत आहे. तसेच सुकन्या कुलकर्णी देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
![rishi saxena]()
Also Read : काहे दिया परदेस या मालिकेतील शिव म्हणजेच ऋषी सक्सेना या अभिनेत्रीच्या पडला प्रेमात