खिचडी येतेय रसिकांचे मनोरंजन करायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:08 IST2018-04-04T08:38:42+5:302018-04-04T14:08:42+5:30

खिचडी लवकरच एक्स्ट्रा कॉमेडी आणि नव्या दमाचे विनोद घेऊन येते आहे. टीव्हीवरील अफलातून जोडी प्रफुल आणि हंसा पुन्हा एकदा ...

Entertain entertainers and entertainers | खिचडी येतेय रसिकांचे मनोरंजन करायला

खिचडी येतेय रसिकांचे मनोरंजन करायला

चडी लवकरच एक्स्ट्रा कॉमेडी आणि नव्या दमाचे विनोद घेऊन येते आहे. टीव्हीवरील अफलातून जोडी प्रफुल आणि हंसा पुन्हा एकदा आपल्या अफाट मस्तीसह तुम्हाला हसवेल. 

पारेख परिवाराचा समावेश असलेल्या मॅडकॅप परिवारात सेव्हन पॅक असून त्यांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही. ह्या परिवाराचे प्रमुख आणि आजोबा तुलसीदास (अनंग देसाई) ऊर्फ बाबुजी प्रत्येक भागात आपल्या परिवारातील सदस्यांचा वेडेपणा पाहून थक्क होतील. अफलातून चक्रम जोडी प्रफुल (राजीव मेहता) आणि हंसा (सुप्रिया पाठक) प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट करतील. प्रफुल अर्थातच स्वतःला इंग्रजीचा मास्तर समजतो आणि आपल्या इंग्रजीचे भयानक हिंदी भाषांतर करतो. त्याची गजरे आवडणारी पत्नी सर्वांनाच सांगते, “हॅलो, हाऊ आर? खाना खाके जाना हां.”

गॉसिप क्वीन जयश्री (वंदना पाठक) आपला फोन ठेऊच शकत नाही कारण तिला अखंड आपल्या आईसोबत गप्पा मारायच्या असतात आणि आपल्या वहिनीच्या विरोधात कारवाया करायच्या असतात. हंसाचा धाकटा भाऊ हिमांशु (जमनादास मजेठिया) केटरिंगच्या व्यवसायात असून आपल्या किस्सी को पता नही चलेगा सह प्रेक्षकांना वेडा करेल. एवढेच नाही तर ह्या परिवारातील मुले जॅकी (अगस्त्य कपाडिया) आणि चक्की (मिसरी मजेठिया) आपल्या घरातील मोठ्‌यांमुळे थकले असून त्यांची मस्तीही प्रेक्षकांना आवडेल. ह्या नवीन शोबद्दल निर्माते / अभिनेता जेडी मजेठिया म्हणाले, “खिचडीसारख्या शोसह आम्ही अख्ख्या कुटुंबासाठी मनोरंजन घेऊन येत आहोत. हा शो सर्वांना एकत्र ठेवतो आणि फॅमिली व्ह्युईंग प्रदान करतो. आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीत आम्ही पुन्हा एकदा एकत्र परिवाराचा अनुभव घेऊन येत आहोत. आमच्या शोमधील एकत्र परिवाराप्रमाणेच आम्हांला असं वाटतं की प्रेक्षकांच्या परिवारांनीही एकत्र यावे आणि ह्या सिटकॉमचा आनंद घ्यावा. खिचडीसारख्या विनोदी शोसोबत परिवारांना एकत्र आणताना आम्हांला छान वाटतंय.”

लेखक / दिग्दर्शक / सहनिर्माता आतिश कपाडिया म्हणाले, “टेलिव्हिजनचा ऱ्हास होत असताना अन्य परिवारांना हसवणाऱ्या परिवाराला परत आणताना आम्हांला छान वाटतंय. सध्याच्या दैनंदिन मालिकांमध्ये केवळ इतर परिवारांमधील समस्या, सामाजिक तणाव आणि खासगी समस्याच पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत मस्त विनोद आणि स्वच्छ पारिवारिक मनोरंजन घेऊन येण्याची खूपच गरज होती. त्यामुळे आम्ही ह्या मॅडकॅप परिवाराला खिचडीसोबत पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत, जे कितीही समस्या आल्या तरी कायम एकत्र राहतात.”

मर्यादित भागांच्या ह्या मालिकेमध्ये सेलेब्रिटी अतिथी हजेरी लावतील. प्रमुख कलाकारांशिवाय प्रेक्षकांना ह्या शो च्या प्रत्येक भागात मनोरंजनाच्या दुनियेतील एक लोकप्रिय चेहरा अनोख्या रूपात पाहायला मिळेल. यात डॉनच्या रूपात रेणुका शहाणे, कॉनमॅनच्या रूपात बख्तियार इराणी, डॉक्टरच्या रूपात दीपशिखा नागपाल, पेंटरच्या रूपात देबिना बॉनर्जी आणि अन्य असे अनेक कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत.

Web Title: Entertain entertainers and entertainers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.