इंग्लिश विंग्लिश फेम दिग्दर्शिका गौरी शिंदेला विचारण्यात आले इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्ससाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:47 IST2017-11-23T06:17:55+5:302017-11-23T11:47:55+5:30

‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत बॉलिवूडमधील ...

English Winglish Fame Director Gauri Shinde was asked for India's Next Superstars | इंग्लिश विंग्लिश फेम दिग्दर्शिका गौरी शिंदेला विचारण्यात आले इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्ससाठी

इंग्लिश विंग्लिश फेम दिग्दर्शिका गौरी शिंदेला विचारण्यात आले इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्ससाठी

ंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत बॉलिवूडमधील दोन दिग्गज दिग्दर्शक पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी कार्यक्रमाच्या टीमने करण जोहर आणि रोहित शेट्टी या बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या जोडीला विचारले असून त्यांनी यासाठी होकार देखील दिला आहे. त्यांच्यासोबत एखादी प्रसिद्ध अभिनेत्री या कार्यक्रमाचा भाग असावी अशी या कार्यक्रमाच्या टीमची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी आजची आघाडीची अभिनेत्री करिना कपूरला विचारले आहे. करिना आजवर कधीच छोट्या पडद्यावर झळकली नाही. त्यामुळे करिनाच्या फॅन्सना तिला छोट्या पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री होती आणि त्यातही करण जोहरच्या कभी खुशी कभी गम आणि रोहित शेट्टीच्या गोलमाल या चित्रपटात करिनाने काम केले आहे. त्यामुळे त्या तिघांची केमिस्ट्री कार्यक्रमात खूप चांगल्याप्रकारे जमून येणार यात कार्यक्रमाच्या टीमला काहीच शंका नव्हती. त्यामुळे करिनाच या कार्यक्रमाचा भाग असावी यासाठी ते प्रयत्न करत होते. पण करिनाकडे सध्या तारखा शिल्लक नसल्याने तिने या कार्यक्रमासाठी नकार दिला आहे. आता तिच्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शिका गौरी शिंदेला या कार्यक्रमासाठी विचारण्यात आले आहे. गौरीने या प्रस्तावावर काय निर्णय दिला हे अद्याप तरी कार्यक्रमाच्या टीमने न सांगणेच पसंत केले आहे.
गौरी शिंदेने इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे तिच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकली. गौरीच्या डिअर जिंदगी या दुसऱ्या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. 
इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स हा टॅलेन्टवर आधारित कार्यक्रम असून करण जोहर आणि रोहित शेट्टी या कार्यक्रमाचा भाग आहेत. गौरीने या कार्यक्रमास होकार दिल्यास तीन दिग्दर्शक एकाच कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या भूमिकेत असण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

Web Title: English Winglish Fame Director Gauri Shinde was asked for India's Next Superstars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.