Engaged :‘चला हवा येऊ द्या’या शोमधील हा सदस्य लवकरच अडकणार रेशीमगाठीत,नुकताच पार पडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 11:22 IST2018-02-08T05:51:50+5:302018-02-08T11:22:22+5:30

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे थुकरटवाडीतील या विनोदवीरांचा 'चला हवा ...

Engaged: 'Let's Come On', this member of the show will soon be caught in silk, in a row recently | Engaged :‘चला हवा येऊ द्या’या शोमधील हा सदस्य लवकरच अडकणार रेशीमगाठीत,नुकताच पार पडला साखरपुडा

Engaged :‘चला हवा येऊ द्या’या शोमधील हा सदस्य लवकरच अडकणार रेशीमगाठीत,नुकताच पार पडला साखरपुडा

करटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो.कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे थुकरटवाडीतील या विनोदवीरांचा 'चला हवा येऊ द्या' हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे.कुशल बद्रिके,सागर कारंडे,भारत गणेशपुरे, भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.रसिकांना ते पोटधरुन हसवतात.याच थुकरटवाडीत आणखी एक सदस्य होता जो रसिकांना खळखळून हसवायचा.त्याची मूर्ती लहान होती तरी किर्ती महान होती.त्याची थुकरटवाडीच्या मंचावरील एनर्जी पाहून सगळेच त्याला छोटे पॉकेट में बडा धमाका असं म्हणायचे.त्या विनोदवीराचे नाव म्हणजे विनीत बोंडे. निशिकांत कामत यांच्या 'डोंबिवली फास्ट' या सिनेमातून विनीतने अभिनयाची कारकिर्द सुरु केली. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती चला हवा येऊ द्या कॉमेडी शोने. कधी हवालदार म्हणून तर कधी लहान मुलगा बनून त्याने रसिकांना हसवलं.आता हाच विनीत लवकरच रेशीमगाठीत अडकणार आहे. त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार सापडली असून तिचे नाव सोनम पवार असे आहे.नुकतंच विनीत आणि सोनम यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत औरंगाबाद इथे पार पडला.आता ४ मार्चला दोघांचा विवाहसोहळा औरंगाबादमध्येच पार पडणार आहे.विनीतने अभिनयाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत उत्तम यश मिळवले आहे.मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात विनीतने बी.ए. केले आहे.तर त्याची भावी पत्नी सोनम ही मूळची सोलापूरची असून ती सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. विनीत आणि सोनम यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. नुकतंच दोघांच्या कुटुंबीयांची पसंती झाली आणि साखरपुडा करण्याचे निश्चित झाले.लवकरच चला हवा येऊ द्याचा हा छोटा विनोदवीर त्याच्या जीवनाची नवी इनिंग सुरु करणार आहे.



Also Read:श्रेया बुगडे तिच्या पती निखीलने कसं केले प्रपोज, जाणून घ्या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी

'चला हवा येऊ द्या'शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो.या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही.ती सुद्धा शोमध्ये कधी श्रीदेवीची मिमिक्री करते तर कधी हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते. त्यामुळेच श्रेया अल्पावधीच रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.श्रेयाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असते. श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.

Web Title: Engaged: 'Let's Come On', this member of the show will soon be caught in silk, in a row recently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.